---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये रचला गेला इतिहास, ४ चेंडूवर ४ विकेट्स घेताना गोलंदाजाने दिली केवळ १ धाव

On: शनिवार, ऑगस्ट 15, 2020 5:30 PM
---Advertisement---

मुंबई । जर्मनीची कर्णधार अनुराधा दोड्डाबल्लापूरने शुक्रवारी टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. अनुराधाने ऑस्ट्रियाविरुद्धच्या चौथ्या टी -20 सामन्यात सलग 4 बळी घेतले. अनुराधाने 3 षटकात 2 निर्धाव टाकत 5 बळी घेतले. यासाठी केवळ एकच धाव दिली.

अनुराधा दोडबल्लापूर ही वेगवान गोलंदाज आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने तिने ऑस्ट्रियन फलंदाजांना खूप हैराण केले होते. अनुराधाने पंधराव्या षटकातील दुसर्‍या बॉलवर जो स्टिग्लिट्झ, तिसर्‍या चेंडूवर ट्यूजेस आणि चौथ्या चेंडूवर अनिषा नुकलाला बाद केले. यानंतर पाचव्या बॉलवर तिने प्रिया साबूला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.19व्या षटकात हरजोत धालीवालला बाद करून आपल्या 5 विकेट्स पूर्ण केल्या.

अनुराधा ही महिला टी 20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग चार बळी घेणारी पहिली खेळाडू आहे. टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 19 महिला खेळाडूंनी हॅटट्रिक घेतली आहे. पण कोणत्याही खेळाडूला सलग चार बळी मिळवता आले नाहीत. अनुराधा हॅटट्रिक घेणारी दुसरी जर्मन गोलंदाज आहे. तिच्याआधी अ‍ॅनी बायर्सविचनेही गुरुवारी ऑस्ट्रियाविरुद्ध हॅटट्रिक केली.

जर्मनीने ऑस्ट्रियाला 177 धावांच्या मोठ्या फरकाने हरवले. जर्मन फलंदाज क्रिस्टीना गोफने नाबाद 101 धावांची खेळी केली. रोनाल्डने 68 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---