---Advertisement---

आयसीसी क्रमवारीत ख्रिस वोक्सची मोठी झेप; आर अश्विनला धोका

On: सोमवार, ऑगस्ट 10, 2020 1:09 PM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंडचा स्टार अष्टपैलू ख्रिस वोक्सने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उडी मारली आहे आणि तो अष्टपैलू क्रमवारीत भारताच्या आर. अश्विनच्या जवळ आला आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात मॅनचेस्टर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वोक्सने आपल्या संघाला सामना तीन गडी राखून जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

पहिल्या कसोटीत वोक्सने फलंदाजी करताना पहिल्या डावात १९ आणि दुसऱ्या डावात नाबाद ८४ धावा केल्या, तसेच त्याने गोलंदाजी करताना दोन्ही डावात प्रत्येकी २ अशा एकूण ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याच्या खास कामगिरीमुळे त्याला आयसीसी क्रमवारीत फायदा झाला.

आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत ख्रिस वोक्सला दोन स्थानाचा फायदा झाला. आता तो 273 गुणांसह तो सातव्या स्थानावर पोहचला. या यादीत भारताचा आर. अश्विन 281 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर रविंद्र जडेजा 397 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

https://twitter.com/ICC/status/1292390177080586240

त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉड टेस्ट अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या दहामध्ये सामील झाला आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला. बेन स्टॉक्स अष्टपैलूच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तथापि, फलंदाजांच्या क्रमवारीत त्यांचा तोटा झाला आहे. वास्तविक पाकिस्तान विरुद्ध तो धावा करू शकला नाही.

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत उतरण्यापूर्वी बेन स्टॉक्स कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर होता, परंतु पाकिस्तानविरुद्ध दोन्ही डावात फ्लॉप झाल्यानंतर तो सातव्या स्थानी घसरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तान संघासाठी ब्रिटनमधील फॅन चक्क स्टेडियमबाहेर वाजवत होता ‘सेक्सोफोन’

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बामती: या देशात सुरु होतेय टी२० लीग; १६ ऑगस्टला होणार अंतिम सामना

इंग्लंडला बसला मोठा झटका; हा अष्टपैलू खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून पडला बाहेर

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू

अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार

एकही आयपीएल आरसीबी जिंकली नाही, पण आरसीबीचे असे ३ विक्रम मात्र मुंबईलाही जमले नाहीत

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---