आधुनिक काळात क्रिकेटच्या विविध टी20 स्पर्धांचे जगभरात आयोजन केले जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रिकेटपटूंना रग्गड पैसा मिळतो. मात्र, मोठी रक्कम मिळूनही काही खेळाडू भ्रष्टचाराला बळी पडतात. श्रीलंकेमधील एक क्रिकेटपटू अशाच सामना फिक्सिंगच्या प्रकरणात अडकला आहे.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि गोलंदाजी प्रशिक्षक नुवान जोयसा याच्यावर सामना फिक्सिंगच्या आरोपाखाली बंदी घातली गेली आहे. त्याला स्वतंत्र ट्रिब्यूनलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचारविरोधी संहिता अंतर्गत तीन गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. आयसीसीने गुरुवारी (20 नोव्हेंबर) ही माहिती दिली आहे. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमाअंतर्गत नोव्हेंबर 2018 मध्ये जोयसावर आरोप लावण्यात आले होते आणि आता त्याला सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.
जॉयसाने स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणासमोर सुनावणी व्हावी असे म्हटले होते. आयसीसीने त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याबद्दल म्हटले आहे की, “हा क्रिकेटपटू निलंबित राहील आणि त्याच्या शिक्षेची घोषणा नंतर केली जाईल.”
युएईमध्ये एका टी20 लीग दरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जोयसा याला मे 2019 मध्ये तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.
JUST IN: Former Sri Lanka player and coach Nuwan Zoysa has been found guilty of three offences under the ICC Anti-Corruption Code.
Details 👇
— ICC (@ICC) November 19, 2020
श्रीलंकेकडून 30 कसोटी आणि 95 वनडे सामने खेळणार्या जोयसाला सप्टेंबर 2015 मध्ये श्रीलंकेचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. श्रीलंका क्रिकेटच्या उच्च परफॉरमन्स सेंटरमध्ये तो काम करायचा, ज्यामुळे त्याला सध्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संपर्क साधण्याची संधी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘लिलाव लवकरच होणार आहे, यावेळी आम्ही… ‘ पंजाबच्या संघमालकाने सांगितली योजना
मोठी बातमी: आयसीसीने महिला टी२० विश्वचषक २०२२ केला स्थगित, आता ‘या’ वर्षी होणार स्पर्धा
‘आर्थिक फायद्यासाठी भारताला मिळतील सोप्या खेळपट्ट्या’, माजी पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त वक्तव्य