---Advertisement---

‘तो तर भारतीय संघाचा व्हीव्हीएस लक्ष्मण’, सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या खेळाडूबाबत माजी भारतीय फिरकीपटूचे वक्तव्य

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 1:50 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. यापूर्वी  दोन्ही संघामध्ये २ सराव सामने खेळवण्यात आले. यातील दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू हनुमा विहारीने शतक ठोकत सर्वांना आपल्या फलंदाजाचा दम दाखवला. यानंतर आता भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाने त्याला भारतीय संघाचा व्हीव्हीएस लक्ष्मण असल्याचे सांगितले. सोबतच म्हटले की, त्याला प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करण्याची गरज आहे. या दौऱ्यावर शेवटच्या तीन सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे विहारीसाठी हा दौरा आणखी महत्त्वाचा ठरतो.

तो म्हणाला, “हनुमा विहारीला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एक कसोटीतज्ज्ञ होणे फायदेशीर आहेच, पण त्याचे नुकसानही आहे. विशेषत: विदेशात जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता, तेव्हा तुम्हाला खास सन्मान मिळतो. परंतु ज्याप्रकारे लोक सातत्याने रिषभ पंत, इशान किशन किंवा सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल चर्चा करतात, त्याप्रकारे त्याच्या नावाची चर्चा होत नाही. कारण हे अशा जागी कामगिरी करत आहेत, जिथे मोठ्या संख्येने लोक पाहत असतात. हेच सत्य आहे.”

“मला वाटते की, ही मालिका विहारीसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. विराट कोहली भारतीय संघात असणार नाही आणि त्याच्या जाण्याने मोठी जागा भरून काढावी लागेल. विहारीने शानदार शतक ठोकले (गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात). परंतु विशेषत: जेव्हा तुम्ही गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्यास उतराल, तेव्हा हे त्याच्यासाठी सोपे नसेल. जर संघात स्थान टिकवायचे असेल, तर सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल,” असेही तो पुढे म्हणाला.

विहारी व्हीव्हीएस लक्ष्मणसारखा खेळाडू- ओझा

“मला हे सांगायचं आहे की, विहारी व्हीव्हीएस लक्ष्मणसारखाच एक खेळाडू आहे. प्रत्येक सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा असायचा. कारण तो कसोटीतज्ज्ञ होता. त्याला प्रत्येक सामन्यात सातत्याने चांगली कामगिरी करावी लागत होती. कारण तो सातत्याने मर्यादित षटकांचा खेळाडू नव्हता. त्याला त्या प्रत्येक सामन्यात कामगिरी करणे महत्त्वाचे असायचे, ज्या सामन्यात खेळण्यासाठी तो उतरायचा,” असे व्हीव्हीएस लक्ष्मणशी विहारीची तुलना करताना ओझा म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

फीटनेस टेस्ट पास केल्या, तर ‘हा’ खेळाडू करेल पदार्पण; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाची पुष्टी

ठरलं तर! ‘या’ दिवसापासून होणार ICC महिला टी२० विश्वचषक २०२२ ला सुरुवात; वेळापत्रकाची घोषणा

T20 World Cup 2022: १५ जागांसाठी भिडणार ८६ संघ; ‘हे’ तीन संघ उतरणार पहिल्यांदाच मैदानात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---