---Advertisement---

ठरलं तर! ‘या’ दिवसापासून होणार ICC महिला टी२० विश्वचषक २०२२ ला सुरुवात; वेळापत्रकाची घोषणा

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 10:57 AM
---Advertisement---

महिला क्रिकेट विश्वातून मोठी बातमी येत आहे. आयसीसीने मंगळवारी (१५ डिसेंबर) महिला टी२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण ३१ सामने होणार आहेत. यातील पहिला सामना ४ मार्च, २०२२ ला वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हमध्ये होणार आहे, तर अंतिम सामना ३ एप्रिल रोजी न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर होणार आहे.

आयसीसीने आपल्या अहवालात म्हटले की, “महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलियात महिलांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर खेळल्या जाणार्‍या पहिल्या जागतिक महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मूळ वेळापत्रक फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये स्थगित करण्यात आली होती. तीच सहा यजमान शहरे आणि ठिकाणे २०२२ साठी राखून ठेवली गेली आहेत.”

भारतीय महिला संघाबाबत बोलायचं झालं, तर भारतीय संघ साखळी फेरीत ७ सामने खेळेल. यातील चार सामने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघाविरुद्ध खेळले जातील. तसेच उर्वरित ३ सामने हे नंतर पात्र ठरलेल्या संघांविरुद्ध खेळले जातील.

“आपण सर्वजण खूप कठीण वर्षातून गेलो आहोत आणि आपल्या सर्वांना आवडणारा हा खेळ खेळणार असल्याचा आनंद आम्हाला आहे. गेल्या तीन-चार वर्षांत भारत आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहे, आपण वनडे विश्वचषक किंवा नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक विषयी बोलायचं झालं आणि जर आम्ही २०२२ मध्ये ही स्पर्धा जिंकू शकलो, तर ते वनडे क्रिकेटमध्ये पुढच्या पिढीतील मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. सोबतच ते कोणत्याही क्रिकेपटूसाठी सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते. मी तुम्हाला आश्वासन देऊ शकते की संघ आणि मी याची प्रतीक्षा करत आहोत,” असे भारताची कर्णधार मिताली राज म्हणाली.

असे असेल वेळापत्रक आणि ठिकाण

दिवस- रात्र सामने (*)

बे ओव्हल, टॉरंगा
०४ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर*
०६ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध भारत*
०८ मार्च, २०२२- ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर*
११ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध दक्षिण आफ्रिका*
१४ मार्च, २०२२- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड*
१६ मार्च, २०२२- इंग्लंड विरुद्ध भारत*
१८ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर

युनिव्हर्सिटी ओव्हल, डुनेडिन
०५ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध दक्षिण आफ्रिका
०७ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर
०९ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध इंग्लंड

सेडन पार्क, हॅमिल्टन
०५ मार्च, २०२२- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड*
१० मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध भारत*
१२ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध भारत*
१४ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर
१७ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका*
२१ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर*
२२ मार्च, २०२२- भारत विरुद्ध क्वालिफायर*

बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
१३ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१५ मार्च, २०२२- ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर
२२ मार्च, २०२२- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२४ मार्च, २०२२- दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर
२५ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२७ मार्च, २०२२- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर
३० मार्च, २०२२- उपांत्य सामना-१

इडन पार्क, ऑकलँड
१९ मार्च, २०२२- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
२० मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड

हेगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
२४ मार्च, २०२२- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर*
२६ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर
२७ मार्च, २०२२- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका*
३१ मार्च, २०२२- उपांत्य सामना-२
०३ एप्रिल, २०२२- अंतिम सामना*

महत्त्वाच्या बातम्या-

T20 World Cup 2022: १५ जागांसाठी भिडणार ८६ संघ; ‘हे’ तीन संघ उतरणार पहिल्यांदाच मैदानात

अफलातून! सिडनीच्या ‘या’ फलंदाजाने ठोकल्या २५ चेंडूत ६५ धावा; ७ षटकारांचाही समावेश

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडची झेप; भारताची वाट झाली अवघड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---