भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज (8 डिसेंबर) सिडनी येथे खेळला जाणार आहे. मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवल्यानंतर भारतीय संघ या सामन्यात व्हाईटवॉश देण्याच्या निश्चयानेच मैदानात पाऊल ठेवेल.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेला ऍरॉन फिंचने तिसऱ्या टी२०त पुनरागमन केले आहे. या सामन्यात तो संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.
भारतीय संघाचे प्लईंग इलेव्हन: शिखर धवन, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, टी नटराजन, युझवेंद्र चहल
ऑस्ट्रेलिया संघाचे प्लेईंग इलेव्हन: मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), ऍरॉन फिंच (कर्णधार), डॉर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मोझेस हेन्रीक्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, एँड्र्यू टाय, मिशेल स्वेप्सन, ऍडम झाम्पा, सीन ऍबॉट
महत्त्वाच्या बातम्या-
“नटराजन ‘या’ मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज”, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
भारत- ऑस्ट्रेलिया सराव सामना: दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब, पुजारा शून्यावर बाद, तर रहाणे…
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?