---Advertisement---

हरभजन जेव्हा माझी विकेट घ्यायचा तेव्हा टीम इंडिया एक शब्द नेहमीच वापरायची, पहा कोणी केलाय हा खुलासा

On: शुक्रवार, ऑगस्ट 7, 2020 10:21 PM
---Advertisement---

मुंबई । भारताचा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विक्रम आहे. हरभजनने आपल्या फिरकी गोलंदाजीवर रिकी पाँटिंग, मॅथ्यू हेडन आणि अ‍ॅडम गिलख्रिस्टसारख्या फलंदाजांना संघर्ष करायला लावला आहे. दरम्यान गिलख्रिस्टने सामन्यादरम्यानची एक आठवण सांगितली. हरभजनविरूद्ध त्याने धावा केल्यावर भारतीय क्षेत्ररक्षक काही बोलत नसत, परंतु हरभजनने त्याला बाद केल्याबरोबर सर्व क्षेत्ररक्षक खास शब्द बोलायचे.

लाइव्ह कनेक्ट कार्यक्रमात गिलख्रिस्ट म्हणाला, ‘मला हा शब्द आठवत नाही, परंतु मला ते इतके आठवते की धावा केल्यावर मला ते काही बोलत नव्हते, परंतु भज्जीने मला बाद केले की एक शब्द भारतीय क्षेत्ररक्षक बोलत होते. ‘

2001 साली झालेल्या मालिकेत हरभजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 32 गडी बाद केले आणि मालिकेत भारताला विजय मिळवून दिला होता. त्या मालिकेत हरभजनने हॅट्रिकही घेतली होती.

गिलख्रिस्टने भारत दौर्‍याबद्दल सांगितले की, ‘मला नेहमीच भारत दौरा करायला आवडतो. भारतातील लोक आपल्याशी चांगले वागतात.’

आपल्या क्रिकेट कारकीर्दीत हरभजनने पॉन्टिंगला 10 वेळा, हेडनला 9 वेळा आणि गिलख्रिस्टला 7 वेळा बाद केले. हरभजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 सामन्यांत 29.95 च्या सरासरीने 95 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---