क्रिकेटमध्ये खेळाडूंना नक्कल करताना आपण अनेक वेळा पाहिले असेल. असंच काहीसं आयपीएल २०२० च्या ४५ व्या सामन्यात पाहायला मिळालं. हा सामना रविवारी (२५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात झाला. यात राजस्थानने मुंबईला ८ विकेट्सने पराभूत केले. यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने शानदार गोलंदाजी केली. त्याने यादरम्यान मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल केल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.
या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. तरीही राजस्थानचा गोलंदाज आर्चरने पावर प्लेमध्ये नव्या चेंडूने पुन्हा एकदा आपल्या चमकदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने मुंबई संघाचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकला पहिल्याच षटकात ६ धावांवर तंबूत पाठवले. त्याचबरोबर त्याने इशान किशनलाही चांगलेच चिंतेत टाकले.
पुढे आर्चरने डावाच्या ११ व्या षटकात किशनलाही पव्हेलियनचा रस्ता दाखवला. आर्चरने आपल्या गोलंदाजीने नव्हे, तर बुमराहची हुबेहुब नक्कल करत चाहत्यांचे मनोरंजन केले. सोशल मीडियावर आर्चरचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/faceplatter49/status/1320421487082270720
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक धावा कुटल्या. त्याने ६० चेंडूत १०७ धावा कुटल्या. यात ३ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच संजू सॅमसननेही ५४ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.
आयपीएल२०२० मध्ये आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यात राजस्थानचा हा पाचवा विजय होता, तर मुंबईचा हा चौथा पराभव होता. यासोबतच राजस्थानने चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफची दारंही बंद केली. चेन्नई आयपीएल २०२० मध्ये प्लेऑफमधून बाहेर होणारा पहिलाच संघ ठरला.
राजस्थानने या विजयासह १० गुण मिळवले. यासह ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर विराजमान झाले. राजस्थानचा पुढील सामना शुक्रवारी (३० ऑक्टोबर) अबु धाबी येथे किंग्स इलेव्हन पंजाबसोबत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा; गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर घेतली उडी
-MIविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनने दाखवले बायसेप्स, काय होता यामागचा उद्देश?
ट्रेंडिंग लेख-
-IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती






