रविवारी (१९ ऑक्टोबर) दुबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रोमांचक सामना झाला. यादरम्यान दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. यातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने सुपर ओव्हरमध्ये पंजाबने दिलेल्या ६ धावांचे आव्हान मुंबईला पार करू दिले नाही. शमीच्या उत्तम कामगिरीवर कर्णधार केएल राहुलने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, शमीला सुपर ओव्हरमधील प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकायचा होता.
विजय मिळवल्यानंतर राहुलने सुपर ओव्हरबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटले की, “मला माझ्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास होता.”
तो पुढे बोलताना म्हणाला, “तुम्ही सुपर ओव्हरची तयारी कधीच करू शकत नाहीत. कोणताच संघ करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गोलंदाजांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. तुम्ही तुमच्या गोलंदाजांवर विश्वास ठेवा आणि त्यांनी स्वत: वर विश्वास ठेवला पाहिजे.”
“सुपर ओव्हरमध्ये शमीची रणनिती पूर्णपणे स्पष्ट होती. त्याला सहाच्या सहा चेंडू यॉर्कर टाकायचे होते. तो एक जबरदस्त गोलंदाज आहे. सोबतच तो प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत आहे. अनुभवी खेळाडूने संघासाठी सामने जिंकवणे खूप महत्त्वत्वाचे आहे,” असे शमीच्या रणनीतिबद्दल बोलताना राहुल म्हणाला.
आमच्या संघाला शेवटी जाऊन विजय मिळवता आला नाही- केएल राहुल
सामनावीर म्हणून निवडलेल्या केएल राहुलच्या मते, त्यांच्या संघाने (किंग्स इलेव्हन पंजाब) सातत्याने अनेक सामन्यांमध्ये अशाप्रकारच्या परिस्थितींचा सामना केला आहे. परंतु त्यांना अशाप्रकारे विजय मिळवायचा नाही.
तो म्हणाला, “हे आमच्यासोबत पहिल्यांदा घडले नाही. परंतु आम्हाला याची सवय लावून घ्यायची नाही. ज्याप्रकारे तुम्ही योजना आखता, नेहमी गोष्टी तशाच घडत नाहीत. त्यामुळे तुम्हाला संतुलन ठेवण्याची आवश्यकता असते. मला फक्त एवढीच आशा होती की, आम्ही सामना संपवू. कारण सर्व खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. जे सामने आम्ही पराभूत झालो, त्यातही आम्ही चांगला खेळ दाखवला. फक्त शेवटी जाऊन विजय मिळवता आला नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
-ड्रामा डबल सुपर ओव्हरचा! मुंबईला धूळ चारत पंजाबने फडकावली विजयी पताका
-सुपर ओव्हर पे सुपर ओव्हर! एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पडला पाऊस
-आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशीचे दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये निकालात….
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
-दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…