fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

October 17, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ BCCI

Photo Courtesy: Twitter/ BCCI


आज(17 ऑक्टोबर) भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळे त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 956 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

तसेच दुखापतग्रस्त असतानाही खेळण्याची जिद्द असणाऱ्या कुंबळेने कसोटी सामन्यात एकाच डावात 10 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रमही केला आहे. त्याचबरोबर कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाचे यशस्वी प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.

भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळबद्दलच्या या खास गोष्टी-

-17 ऑक्टोबर 1970 मध्ये अनिल कुंबळेचा जन्म कर्नाटकमधील बंगळूरुमध्ये झाला आहे.

– त्याच्या गोलंदाजीत असणाऱ्या विविधतेमुळे त्याचबरोबर त्याच्या उंचीमुळे त्याला जम्बो या टोपन नावानेही ओळखले जाते.

-कुंबळे हा जसा उत्तम क्रिकेटपटू आहे तसाच तो आभ्यासातही हुशार होता. त्याने क्रिकेटबरोबरच मॅकेनिकल इंजिनियरींगचेही शिक्षण पूर्ण केले आहे.

-त्याने वयाच्या 13 व्या वर्षी यंग्स क्रिकेटर्स क्लबमध्ये प्रवेश घेतला होता.

-त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिला सामना कर्नाटककडून हैद्राबाद विरुद्ध वयाच्या 19 व्या वर्षी खेळला आहे.

-कुंबळे हा जरी फिरकीपटू असला तरी त्याने मध्यमगती गोलंदाज म्हणून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती.

-कुंबळे हा कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा कपिल देव नंतरचा दुसराच गोलंदाज आहे. तसेच कसोटीत 500 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा पहिला आणि सध्यातरी एकमेव गोलंदाज आहे. त्याने कसोटीमध्ये एकूण 619 विकेट्स घेतल्या आहेत.

-तो कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने हा कारनामा 35 वेळा केला आहे.

There's only ever been two 10 wicket hauls in a Test innings. Whose was the greatest? Jim Laker or @anilkumble1074? pic.twitter.com/qi1jQGHtCb

— ICC (@ICC) February 7, 2017

-कुंबळेला 1995 मध्ये अर्जून पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. तसेच 2005 मध्ये त्याचा पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याला 1996 या वर्षातील विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकटपटूचा पुरस्कार मिळाला आहे.

-कुंबळे हा कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात 10 विकेट घेणारा केवळ दुसरा गोलंदाज आहे. त्याने 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानात पाकिस्तान विरुद्ध हा पराक्रम केला आहे.

#OnThisDay in 1999….

26.3 overs
9 maidens
74 runs
🔟 wickets! @anilkumble1074 tore through Pakistan in Delhi with a stunning 10/74, becoming just the second man after Jim Laker to take all ten wickets in a Test innings! 🙌 pic.twitter.com/B8Nz2bRbeL

— ICC (@ICC) February 7, 2019

-2002 मध्ये विंडिज विरुद्ध अँटीग्वा कसोटीत हनवटीचे फ्रॅक्चर असतानाही त्याने गोलंदाजीला येऊन दोन विकेट घेतल्या होत्या. यातील ब्रायन लाराची महत्त्वाची विकेट त्याने घेतली होती.

-कुंबळे हा आयपीएलमध्ये बेंगलोर संघाकडून खेळला असून तो 2009 आणि 2010 च्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

REWIND 📽️📽️: On @anilkumble1074's Birthday, here's how one of the most iconic events in cricket inspired many 💪💪

Happy Birthday Legend 👏👏 pic.twitter.com/tq1YOH4KxT

— BCCI (@BCCI) October 17, 2019

-कुंबळे हा फक्त एक चांगला गोलंदाजाच होता असे नाही. तर त्याने अनेकदा भारताच्या फलंदाजीतही योगदान दिले आहे. कुंबळेने कसोटीमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतके केली आहे. त्याने हे एकमेव शतक 10 ऑगस्ट 2007 साली इंग्लंड विरुद्ध केले होते. त्याने कसोटीमध्ये 132 सामन्यात 2506 धावा केल्या आहेत.

-कुंबळेने 1995-96 च्या मोसमात कौउंटी क्रिकेटही खेळले. तो नॉर्थम्पटॉनशायरकडून खेळला.

-कुंबळेने भारताचे 14 कसोटी आणि 1 वनडे सामन्यात नेतृत्व देखील केले आहे.

Happy Birthday to one of the greatest spin bowlers of all time, @anilkumble1074! pic.twitter.com/DQ3KEnsw3T

— ICC (@ICC) October 17, 2015

-जून 2016 मध्ये कुंबळेने भारतीय संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली होती. त्यानंतर त्याने एक वर्ष ही जबाबदारी सांभाळली. पण कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक बदलीसाठी केलेल्या मागणीनंतर त्याने जून 2017 मध्ये प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

-कुंबळेने निवृत्तीनंतर क्रिकेट प्रशासनामध्ये प्रवेश केला. त्याने कर्नाटक क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय आणि आयसीसीच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.

-बंगळुरुमध्ये एका रस्त्याला कुंबळेचे नाव देण्यात आले आहे.

-कुंबळेने चेतना समतिर्थ हीच्याशी तिचा पहिल्या लग्नाच्या घटस्पोटानंतर लग्न केले आहे.

वाचा –

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’


Previous Post

मी काही केलंच नाही! तुषार देशपांडेला धक्का दिल्यामुळे श्रेयस झाला ट्रोल

Next Post

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक विजय मिळवून देणारे भारतीय संघातील हिरे! जाणून घ्या या ५ खेळाडूंची संघर्षगाथा

January 20, 2021
Photo Courtesy: Facebook/cricketworldcup
क्रिकेट

वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याची या दिवशी होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकावले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज 'अनिल कुंबळे'

Photo Courtesy: www.iplt20.com

मुंबईच्या सांघिक कामगिरीपुढे कोलकाताचा पालापाचोळा, पुन्हा ठरली अव्वल

Photo Courtesy: www.iplt20.com

दिनेश कार्तिक आणि केकेआर संघ, अशी होती गेल्या २ वर्षांतील आकडेवारी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.