fbpx
Wednesday, January 27, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोलंदाजीत फसला म्हणून काय झालं? फलंदाजी करताना ठोकले ४ षटकार

September 24, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/KKRiders

Photo Courtesy: Twitter/KKRiders


मुंबई । बुधवारी झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या विजयाचा सर्वात मोठा नायक होता. पहिल्या तीन षटकांत केवळ 5 धावा देऊन कोलकाता नाईट रायडर्स संघाचे 2 बळी घेणार्‍या बुमराहने यापूर्वीच मुंबईसाठी विजयाचा मार्ग तयार केला होता. त्याच्या शानदार गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण बुमराहच्या शेवटच्या म्हणजेच चौथ्या षटकात त्याच‍ा शानदार स्पेल पॅट कमिन्सने उध्वस्त केला. गोलंदाजीत फ्लॉप झाल्यावर त्याने बुमराहच्या चेंडूंवरच सर्व राग काढून टाकला. बुमराहच्या चौथ्या षटकात 4 षटकार मारून कमिन्सने मुंबई इंडियन्सच्या गोटात खळबळ माजविला.

सामन्याच्या सोळाव्या षटकात आंद्रे रसेल आणि नंतर ऑयन मॉर्गनसारख्या धोकादायक फलंदाजांना बाद करून बुमराहने मुंबईचा विजय स्पष्ट केला. कोलकाताला अखेरच्या 3 षटकांत म्हणजेच 18 चेंडूत 84 धावांची गरज होती. केकेआरच्या 7 विकेट्स आधीच पडल्या होत्या. अशा परिस्थितीत केकेआरला हे मोठे लक्ष्य गाठणे अवघड आव्हान होते. रोहितने चेंडू बुमराहच्या हाती सोपविला. स्ट्राइकवर पॅट कमिन्स होता. यानंतर बुमराहची अवस्था पाहण्यासारखी होती. पहिल्याच चेंडूवर कमिन्स त्याच्यावर तुटून पडला. कमिन्सच्या फलंदाजीमुळे स्टेडियममध्ये खळबळ उडाली.

जसप्रीत बुमराहच्या या षटकात कोलकाता संघाने 27 धावांची लूट केली.  टी20 कारकीर्दीतील हे त्याचे सर्वात महागडे षटक होते.  टी20 सामन्यात बुमराहच्या षटकात 4 षटकार मारण्याची ही पहिली वेळ होती. पहिल्या तीन षटकांत केवळ 5 धावा खर्च करणार्‍या बुमराहने 4 षटकांमध्ये 32 धावा दिल्या.

पॅट कमिन्सचा पलटवार

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला केकेआरने 15.5 कोटींच्या मोठ्या किंमतीत खरेदी केले आहे. कमिन्स गोलंदाजीत अत्यंत फ्लॉप होता. त्याने पहिला चेंडू वाइड फेकला आणि त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर रोहित शर्माने शानदार षटकार लगावला. पहिल्याच षटकात कमिन्सने 15 धावा दिल्या. कमिन्सने त्याच्या 3 षटकांत 49 धावा खर्च केल्या. या सामन्यातील तो सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. सामन्यादरम्यान कमिन्सला सोशल मीडियावर ट्रोल केले. पण सामन्यात फलंदाजी करताना त्याचा 275 असा सर्वोत्तम स्ट्राईक रेट होता. कमिन्सने केवळ 12 चेंडूंत 33 धावा फटकावल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-क्रिकेट जगतावर शोककळा, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूचे मुंबईत निधन

-दिल्ली संघाचा ‘हा’ वेगवान गोलंदाज जखमी, पुढील एक- दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता

-“गेल्या 18 महिन्यांपासून मी अव्वल क्रमांकाचा चिअरलीडर आहे,” पाहा कोण म्हणतंय

ट्रेंडिंग लेख-

-आठवण डीन जोन्स यांच्या ‘त्या’ संस्मरणीय द्विशतकाची

-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज

-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज


Previous Post

दिग्गज क्रिकेटपटूंच्या बायका आयपीएल दरम्यान घेतात ड्रग्स, पहा कुणी केलाय आरोप

Next Post

एकेकाळी आरसीबीकडून खेळलेले ‘हे’ ७ खेळाडू आज आरसीबी विरुद्धच उतरलेत मैदानात

Related Posts

क्रिकेट

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

भारत-इंग्लंड मालिकेला नाव दिलेले ‘ऍन्थनी डी मेलो’ आहेत तरी कोण?

January 26, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

भारताविरुद्धच्या दौऱ्यातून संघाबाहेर काढल्याने बेअरिस्टोची घेतली डीकेवेलाने फिरकी, म्हणाला….

January 26, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic
टॉप बातम्या

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : गतविजेत्या कर्नाटकाचा पराभव, पंजाबचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

January 26, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

एकेकाळी आरसीबीकडून खेळलेले 'हे' ७ खेळाडू आज आरसीबी विरुद्धच उतरलेत मैदानात

Photo Courtesy: www.iplt20.com

विक्रमवीर राहुल! आयपीएलच्या ६० डावात 'ही' कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Photo Courtesy: Twitter/IPL

पंजाबच्या कर्णधाराने 'या' विक्रमात मास्टर ब्लास्टर सचिनलाही टाकलंय मागे

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.