---Advertisement---

IPL अपडेट : पाहा ७ सामन्यानंतर आयपीएलचा गुणफलक, तर ‘हे’ खेळाडू ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 7:11 PM
---Advertisement---

१९ सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या आयपीएल २०२०चे आतापर्यंत एकूण ७ सामने पार पडले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ७व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला ४४ धावांनी पराभूत केले आहे. या दमदार विजयानंतर दिल्ली संघाला पाँईंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. तर चेन्नई संघाची घसरण झाली आहे.

सात सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल

पाँईंट टेबल म्हणजेच गुणतालिकेत दिल्ली संघ आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजयी होत, अव्वल स्थानावर आला आहे. तर किंग्स इलेव्हन पंजाब दूसऱ्या आणि मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स या टेबलमध्ये चौथ्या तर चेन्नई संघ पाचव्या स्थानावर आला आहे.

तर पहिल्या सामन्यात विजयी आणि दूसऱ्या सामन्यात पराभूत झालेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सहाव्या क्रमांकावर आला आहे. शिवाय आतापर्यंत केवळ एक सामना खेळून त्यातही पराभूत झालेले कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराइझर्स हैदराबाद संघ अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत.

फाफ डू प्लेसिसला मिळाली ऑरेंज कॅप

सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावण्याची कामगिरी केली आहे, चेन्नई सुपर किंग्सचा धुरंधर फलंदाज फाफ डू प्लेसिसने. आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यात डू प्लेसिसने एकूण १७३ धावा केल्या आहेत. तर पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल २ सामन्यात १५३ धावा करत दूसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, मयंक अगरवालने २ सामन्यात ११५ धावा केल्या आहेत आणि तिसरे स्थान मिळवले आहे. तर रोहित शर्माने २ सामन्यात ९२ आणि एबी डिविलियर्सने एका सामन्यात ७९ धावा केल्या आहेत.

कागिसो रबाडाला मिळाली पर्पल कॅप 

दिल्ली कॅपिटल्सला सुपर ओव्हरसमध्ये विजय मिळवून देणारा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने पर्पल कॅप मिळवली आहे. आतापर्यंत खेळलेल्या २ सामन्यात सर्वाधिक ५ विकेट्स चटकावत त्याने हा कारनामा केला आहे. तर सॅम करनने ३ सामन्यात ५ विकेट्स घेत दूसरा क्रमांक पटकावला आहे. मोहम्मद शमी २ सामन्यात ४ विकेट्स घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर शेल्डन कॉटरेल आणि युझवेंद्र चहलनेही २ सामन्यात प्रत्येकी ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-चाहते करतायत मिस्टर आयपीएल रैनाच्या पुनरागमनाची विंनती, सीएसकेच्या सीईओने दिले ‘हे’ उत्तर 

-कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात रसेल, वॉर्नरसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी

-कोलकाताविरुद्धच्या सामन्यापुर्वी हैदराबादला मोठा झटका, ‘हा’ स्टार फलंदाज राहणार संघाबाहेर

ट्रेंडिंग लेख –

-क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?

-आयपीएलमध्ये शेवटच्या २ षटकात गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारे ३ फलंदाज

-असा कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---