मुंबई । आयपीएलच्या 13 व्या मोसमाला येत्या 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यासाठी सर्व संघांची तयारी सुरु झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघ 15 ते 20 ऑगस्ट या कालावधीत संघाचे शिबिर (प्री-सिझन कंडीशनिंग कॅम्प) घेणार आहे. पण या शिबिरात अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा सहभागी होणार नाही.
जडेजा वगळता सीएसकेचे इतर सर्व मोठे खेळाडू या शिबिराचा भाग असतील. यामध्ये एमएस धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना यांचा समावेश आहे. सीएसके संघात असलेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फाफ डु प्लेसिस आणि लुंगी एन्गिडी 1 सप्टेंबरनंतर युएईमध्ये दाखल होतील.
सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले की, “जडेजा वैयक्तिक कारणास्तव संघाच्या शिबिरात सहभागी होणार नाहीत. पण तो 21 ऑगस्टपूर्वी चेन्नईला पोहचेल. या दिवशी चेन्नईचा संघ दुबईला जाईल.
याबरोबरच विश्वनाथन म्हणाले की, तामिळनाडू सरकारने आम्हाला एमए चिदंबरम स्टेडियमवर शिबीर घेण्यास परवानगी दिली आहे. शिबिराच्या परिसरात कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. यावेळी फक्त गोलंदाजी प्रशिक्षक एल बालाजी शिबिरात उपस्थित राहतील. संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, सहाय्यक प्रशिक्षक मायकल हसी थेट दुबईमध्ये दाखल होणार आहेत. 22 ऑगस्टपर्यंत हे दोघेही संघात दाखल होण्याची शक्यता आहे.
एन्गिडी आणि डु प्लेसिस 1 सप्टेंबरनंतर युएईमध्ये दाखल होतील
सीएसकेच्या सीईओने सांगितले की 1 सप्टेंबरनंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फाफ डु प्लेसिस आणि लुंगी एन्गिडी युएईमध्ये दाखल होतील. सध्या दक्षिण आफ्रिकेने कोरोनामुळे देशाच्या सीमा सील केल्या आहेत. प्रवासी बंदीमुळे वाहतूकही बंद आहे. त्याचबरोबर कॅरिबियन प्रीमियर लीग संपल्यानंतर इम्रान ताहिर संघात सामील होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी; तरीही ठोकले अर्धशतक
किंग्ज ११ पंजाबचा त्रिशतकवीर खेळाडू कोरोनातून बरा, खेळणार आयपीएल २०२०
‘खेळाडूंनो सोशल मीडियापासून दूर राहा,’ पाहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख –
या ३ खेळाडूंनी मारलेत सीएसकेसाठी सर्वाधिक षटकार
भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास
डावखुऱ्या भारतीय खेळाडूंची ड्रीम ११; पहा कोण आहे यष्टीरक्षक