भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहे. पण या दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. त्याच्या या निर्णयाबद्दल क्रिकेट चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी त्याच्या या निर्णयावर टीका केली आहे.
कसोटी मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना १७ डिसेंबरपासून सुरु होईल. या सामन्यानंतर विराट भारतात येणार आहे, कारण त्याच्या आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माच्या पहिल्या बाळाचा जन्म जानेवारी २०२१ मध्ये होणार आहेत. त्यामुळे विराटला बीसीसीआयने पालकत्व रजा मंजूर केली आहे.
विराटच्या या निर्णयावर चाहत्यांचे पडले दोन गट –
विराटच्या पालकत्व रजा घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काही चाहत्यांनी त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हा निर्णय चांगला आहे. तसेच काहींनी म्हटले आहे की हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, त्यावर कोणी भाष्य करणे योग्य नाही.
मात्र काहींनी विराटची तुलना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीशी करत टीका केली आहे. धोनी जेव्हा पहिल्यांदा वडील झाला होता, तेव्हा तो २०१५ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघासह ऑस्ट्रेलियामध्ये होता. त्यावेळी त्याने भारतात परत न जाता ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता धोनीचे उदाहरण देत चाहत्यांनी विराटला ट्रोल केले आहे. त्यांचे म्हणने आहे की जर धोनी हे करु शकतो, तर विराट का नाही.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया –
That is Dhoni, this is Virat.. it's their personal choice. You can't interfere in their personal life.
— Prashanth Bhat (@prashanthb95) November 9, 2020
And then there was MS DHONI who didn't even leave his team in the middle of Australia Tour even when his daughter was born. Also world cup was nearing.
"I am on national duty everything else can wait" – MS DHONI'S answer to media when asked about the birth of his 1st child
— Onkar Nirhali (@dummyengineer96) November 9, 2020
https://twitter.com/adityakumar480/status/1325759136508702727
https://twitter.com/bhavin_238/status/1325758312340578304
Though I respect Virat Kohli and his paternity leave is very much genuine and he deserves it..
And that's why MS Dhoni becomes more special because his first priority was his Nation when Ziva was born.
It takes a lot of courage to become The MS Dhoni..!!#AUSvIND— Ashim Prakash (@apjpsinha) November 9, 2020
That will be another excuse for India after losing a series against Australia.
— Jahanzaib Shaikh (@JahanzabShaikh) November 9, 2020
Just heard Kohli won't take part in 3 of 4 test matches against the aussies due to 'Paternity leave'. We will play without our best test batsman.
Then we had dhoni who didn't come back to India during the 2015 wc when ziva was born. Priorities matter. #INDvAUS #INDvsAUS
— Varun Garg 🇮🇳 (@IamV_Garg) November 9, 2020
Why is Kohli questioned for taking a paternity leave? It doesn't make sense to throw in what Dhoni said and compare. It's a personal choice. Let him live his life like you happily live yours.
— Rohit Sankar (@imRohit_SN) November 9, 2020
https://twitter.com/__kaushik18/status/1325679650962468865
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दोन संघात पहिली ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल. त्यानंतर ४ डिसेंबरपासून टी२० मालिका सुरु होईल. यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हा दौरा १९ जानेवारी २०२१ ला संपणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…त्यामुळे भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका सहज जिंकेल”, माजी कर्णधाराची भविष्यवाणी
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर