कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल २०२०) सुरु होण्यासाठी आता फक्त २ आठवडे बाकी आहेत. त्यापुर्वी जमैका तलावाह्ज संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. या संघातील दोन खेळाडू जेवर रॉयल आणि आंद्रे मैकार्थी यांना सीपीएल २०२०मधून बाहेर करण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंनी कोरोनाबाधितांबरोबर वेळ घालवल्यामुळे त्यांना टूर्नामेंटमधून बाहेर करावे लागले आहे. मात्र, जमैका संघाचा जो अन्य खेळाडू कोरोनाबाधित आहे त्याचे नाव अजून समोर आले नाही. परंतु, स्थानिक माध्यमांनुसार तो खेळाडू सेंट किट्स आणि नेविस पैट्रियट्सकडून सीपीएल खेळणार होता, हे कळले आहे. Jamaica Tallawahs 2 Players Forced Out Due To Spending Time With Covid-19 Pandemic Player
जमैका क्रिकेट असोसिएशनचे सीईओ कर्टनी फ्रांसिस यांनी पुष्टी केली आहे की, “जमैकाच्या एका क्रिकेटपटूला कोरोना झाला आहे आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या अजून २ क्रिकेटपटूंना सीपीएलमधून बाहेर करण्यात आले आहे. वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, जमैकाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि बॅकरुम स्टाफच्या सदस्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांची लवकरच कोरोना चाचणी केली जाईल.”
तसेच पुढे बोलताना कर्टनी फ्रांसिस म्हणाले की, “हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण, अशामुळे कोणतीही व्यक्ती कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडू शकते. शिवाय, जमैकाच्या दोन्ही खेळाडूंसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. कारण, त्यांच्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना त्यांना फक्त प्रोटोकॉलमुळे टूर्नामेंटमधून बाहेर करावे लागले आहे.”
सीपीएल २०२०चे सर्व सामने यंदा त्रिनिदादमध्ये होणार आहेत. परंतु, जेवर रॉयल आणि आंद्रे मैकार्थी यांना कोरोनाबाधित खेळाडूच्या संपर्कात आल्यामुळे टूर्नामेंटसाठी पाठवले जाणार नाही. त्यांच्या आता २ कोरोना चाचणी करण्यात येतील आणि त्यानंतर १४ दिवसांसाठी त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल.
सीपीएल २०२०ची सुरुवात १८ ऑगस्टपासून होणार आहे. यावेळी लीगमध्ये एकूण ३३ सामने खेळले जातील. हे सर्व सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होतील. टॉरुबामध्ये असणाऱ्या ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत २३ सामने होतील आणि पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओव्हल मैदानावर १० सामने होतील. उपांत्यपुर्व फेरी आणि अंतिम सामना ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
दुबईत आयपीएल पहायला जाणार क्रिकेटर्सचा परिवार? पहा बीसीसीआयने काय घेतला निर्णय
डोंगराएवढे लक्ष आयर्लंडने पार करत इंग्लंडला चारली पराभवाची धुळ, २०११ विश्वचषकाची झाली आठवण
यावेळी आयपीएलमध्ये चुकिला माफी नाही! ती एक चुक खेळाडूंना पडणार भलतीच महागात
ट्रेंडिंग लेख –
५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक
धोनीच्या लाडक्या खेळाडूसह या ५ क्रिकेटर्सचं नशीब आयपीएलमध्ये राहिलं खराब
आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष