---Advertisement---

इतिहास घडला! इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने दहाव्या क्रमांकावर खेळताना ठोकले तुफानी शतक

On: मंगळवार, ऑगस्ट 18, 2020 11:10 AM
---Advertisement---

मुंबई । क्रिकेटच्या मैदानावर बर्‍याचदा अविश्वसनीय कामगिरी पाहायला मिळते. बर्मिंगहॅमच्या मैदानावरही असेच काहीसे पहायला मिळाले. इंग्लंडमध्ये बॉब विलिस ट्रॉफीमध्ये, सोमरसेटचा खेळाडू जेमी ओव्हरटनने दहाव्या क्रमांकावर खेळताना अवघ्या 92 चेंडूत 120 धावा ठोकल्या. जेमी ओव्हरटनने ही तडाखेबाज खेळी वॉर्कशायरविरुद्ध केली.

जेमी ओव्हरटनने 13 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने केवळ 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि 130 च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना 120 धावांवर बाद झाला. ओव्हरटनने 96 धावा केवळ चौकार आणि षटकार ठोकून काढल्या. त्याने आपल्या खेळीत 6 षटकार आणि 15 चौकार लगावले.

9 व्या विकेटसाठी जेमी ओव्हरटनने स्टीव्ह डेव्हिससह केवळ 173 चेंडूत 180 धावांची भागीदारी केली. स्टीव्ह डेव्हिसनेही 123 धावांची मोठी खेळी साकारली.

जेमी ओव्हरटनने 80 टक्के धावा चौकार आणि षटकार ठोकून केल्या. इतकेच नव्हे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहाव्या स्थानावर खेळताना तो सॉमरसेटसाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाजही ठरला आहे. जेमी ओव्हरटनचेही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे.

जेमी ओव्हरटनची चमकदार फलंदाजी करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या आठवड्यात त्याने 43 चेंडूंत 68 धावा फटकावून आपल्या संघाची धावसंख्या 222 पर्यंत पोहोचवली. जेमी ओव्हरटनचा भाऊ क्रेग ओव्हरटन हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो इंग्लंडकडून अ‍ॅशेसमध्येही खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---