मुंबई । भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजचा मुकुट नेसलेला आणि उत्तम यॉर्कर टाकून फलंदाजांना चकवणाऱ्या या 26 वर्षीय खेळाडूने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला ‘यॉर्कर’ टाकणारा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचे सांगितले.
बुमराने इंडियन प्रीमियर लीग फ्रेंचायजी मुंबई इंडियन्सच्या ट्विटच्या माध्यमातून म्हणाला की, “श्रीलंकेच्या या सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या चेंडूवर आपले प्रभुत्व निर्माण करत आपल्या फायद्यासाठी उपयोग केला.”
कोरोना महामारीच्या ब्रेकनंतर तो ट्रेनिंगसाठी पुनरागमन करेल तेव्हा त्याच्या शरीरावर किती असर पडेल? यावर बोलताना म्हणाला, “मी गेल्या सहा दिवसांपासून व्यायाम करत आहे, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून गोलंदाजी केली नाही. ‘ब्रेक’नंतर जेव्हा मी गोलंदाजी करीन तेव्हा शरीरावरती किती असर पडेल हे सांगू शकेन.”
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमरा हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियनच्या संघाकडून खेळतात. बुमरा आयपीएलमध्ये खेळत असताना लसिथ मलिंगा कडून गोलंदाजीविषयी सातत्याने मार्गदर्शन घ्यायचा. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीत खूपच सुधारणा झाली असल्याचे यापूर्वीच बुमराने सांगितले आहे. विशेष म्हणजे दोघांचीही गोलंदाजी करण्याची शैली ही वेगळी आहे.