काल (८ ऑगस्ट) न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू आणि जगातील सर्वात कूल कर्णधार अर्थात केन विलियम्सनचा ३०वा वाढदिवस होता. जगभरातील चाहत्यांनी या विशेष दिवशी विलियम्सनवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये भारतीय चाहत्यांचाही समावेश होता. अनेक भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे विलियम्सनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, एका भारतीय चाहत्याने विलियम्सनच्या वाढदिवसादिवशी न्यूझीलंडच्या अष्टपैलू क्रिकेटपटू जिम्मी नीशमला ट्रोल केले.
झाले असे की, जगभरातील खेळाडूंनी विलियम्सनला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या. पण, जिम्मी नीशमने एवढ्या विशेष दिवशीदेखील सोशल मीडियावरुन विलियम्सनला एकही मॅसेज केला नाही. हे पाहता, एका भारतीय चाहत्याने नीशमला ट्रोल करायला सुरुवात केली. नीशमनेही जबरदस्त प्रत्युत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली.
भारतीय चाहत्याने नीशमला म्हटले होते की, “आपला प्रिय कर्णधार केन विलियम्सनला ३०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या शुभेच्छा कुठे आहेत? ना इंस्टाग्रामवर ना ट्विटरवर, कुठेही एकदेखील स्टोरी दिसत नाही. न्यूझीलंमध्ये आता रात्र होत आली आहे, नाही का?”
यावर प्रत्युत्तर देत नीशमने लिहिले की, त्याने विलियम्सनला सर्वात सुंदर भेट दिली आहे. खरं तर, न्यूझीलंडच्या कर्णधाराला वर्चुअल शुभेच्छा दिलेल्या आवडत नाहीत. नीशमने ट्विट केला, “जर तुम्ही विलियम्सनला चांगले ओळखत असाल. तर तुम्हाला हेदेखील माहिती असेल की, त्याला सर्वात्कृष्ट भेट ही इंस्टाग्रामवर जन्मदिवसाच्या शुभेच्छा न देता देऊ शकता.”
नीशमच्या या प्रत्युत्तरावर आयसीसीनेही एक इमोजी शेअर केला आहे. Jimmy Neesham Responds Indian Fan Who Asked Him For Birthday Wish To Kane Williamson
If you know Kane well, you know the best gift you can give him is NOT putting up an Instagram wishing him a happy birthday. https://t.co/X7vjkYgE2z
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) August 8, 2020
😬 https://t.co/XjwZKLPs3Y https://t.co/ewOzy4cPje
— ICC (@ICC) August 8, 2020
८ ऑगस्ट १९९०ला जन्मलेल्या केन विलियम्सनने ऑगस्ट २०१०ला भारताविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विलियम्सनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ८० कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ६४७६ धावा केल्या आहेत. तर, वनडे क्रिकेटमध्ये १५१ सामन्यात ६१७४ धावा आणि टी२० क्रिकेटमध्ये ६० सामन्यात १६६५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी हार्दिक पंड्यामुळे चूक नसतानाही बॅन झालेला क्रिकेटर म्हणतोय, प्लीज तुझ्या मुलाला भविष्यात…
बापरे! आयसीसीच्या फेसबुक पेजने रचला इतिहास, व्हिडिओ चॅनेलला तब्बल १.६५ अब्ज वेळा पाहण्यात आले
अवघ्या ७० मिनिटांत ठोकले होते शतक, ९९ वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित
ट्रेंडिंग लेख –
टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री