किंग्ज इलेव्हन पंजाबचा अनुभवी फलंदाज करुण नायरने भारतीय संघात स्थान मिळवण्याबाबत मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की, जर त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली, तर तो निश्चितपणे भारतीय संघात स्थान मिळवू शकेल.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना करुण नायर म्हणाला, “हा आयपीएलचा नवा हंगाम आहे, आम्ही सर्व खेळाडू खेळणार याचा मला आनंद आहे. आम्हाला एक संधी मिळत आहे. आयपीएल आयोजित करण्यासाठी खूप कष्ट घेत असलेल्या बीसीसीआय आणि सरकारचे आभार मानण्याची गरज आहे. इतक्या वेळानंतर सर्व खेळाडूंना भेटून मला आनंद झाला आहे. तसेच युएईमध्येही खेळायला मला एक संधी मिळत आहे. मी खूप उत्साही आहे आणि आशा आहे की मी माझ्या संघाला काही सामने जिंकून देईल.”
तो असेही म्हणाला की, “आयपीएल हे एक मोठे व्यासपीठ आहे आणि जर मी येथे सातत्याने चांगली कामगिरी केली तर मला निश्चितच भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी मिळेल.”
करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावले आहे. असे असूनही त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याला पुनरागमन करता आले नाही. यानंतर, 2018 मध्ये तो इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सदस्य होता परंतु त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचवेळी हनुमा विहारीला संघात संधी देण्यात आली.
मागील आयपीएल हंगामात करुण नायरला मिळाली होती केवळ 1 सामना खेळण्याची संधी
टी20 मध्ये 132.14 चा स्ट्राईक रेट असूनही मागील आयपीएल हंगामात करुण नायरला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र, आता तो आपला नवीन कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करणार आहे. केएल राहुल यंदाच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असेल.
केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीरने केएल राहुलविषयी मोठे वक्तव्य केले आणि सांगितले की, केएल राहुल या आयपीएल हंगामात काय करतो ते बघायचे आहे. गौतम गंभीर म्हणाला, “केएल राहुल हा आयपीएलच्या हंगामात काय करतो हे मला बघायचे आहे. पण माझ्या मते केएल राहुल टी20 चा जबरदस्त खेळाडू आहे. कदाचित तो कसोटीत चांगला नसला तरी टी20 आणि वनडे क्रिकेटमधील खूप चांगला खेळाडू असेल. यावेळेस तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असणार आहे. त्यानंतर कर्णधारपद त्याला शोभेल की नाही हे पाहणे बाकी आहे. कारण कर्णधारपद मिळवल्यानंतर बरेच खेळाडू चांगले होतात. कर्णधारपदाच्या दबावाखाली बरेच खेळाडू विखुरले जातात.”
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल २०२० बाबत विराट कोहली म्हणतो, मला २०१६ सारखं…
-त्याला फटकेबाजी करताना रोखणे केवळ अशक्य, आम्हाला प्लॅनच बदलावा लागणार
-मॅक्सवेल संघात असल्याने सर्वोत्तम अष्टपैलूला पंजाब संघात स्थान मिळणे झाले महाकठीण
ट्रेंडिंग लेख-
-जर तेव्हा टी-२० क्रिकेट असते तर, हे ५ दिग्गज खेळाडू ठरले असते हिरो
-आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
-एकहाती सामना बदलायची ताकद ठेवणारा प्रत्येक संघाचा दमदार परदेशी खेळाडू