अबु धाबी येथे रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ९ विकेट्सने पराभूत झाला. त्यामुळे पंजाब संघ आयपीएल २०२०च्या दुसऱ्या हाफमध्ये चांगली कामगिरी करूनही प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. यानंतर संघातील खेळाडू निराश झाले आहेत. अशामध्ये पंजाबचा अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशमने एक भावुक ट्वीट केले आहे.
जे काही झाले ते पचवणे खूप कठीण- जिम्मी नीशम
तो म्हणाला, “आज जे काही झाले, ते पचवणे खूप कठीण आहे. आम्ही ही स्पर्धा जिंकणार असा विश्वास होता. आणि संघाच्या कामगिरीवरून ते स्पष्ट होते. पराभवानंतर निराश होण्यापेक्षा या गोष्टीवर विश्वास बसत नाही की, आम्ही हे करू शकत नाही. मैदानात उपस्थित नसला, तरीही सर्व चाहत्यांना धन्यवाद. पुढील हंगामात नक्की चांगली कामगिरी करू. हे माझे वचन आहे.”
Very hard to swallow something like tonight. The belief that we could win this competition was always evident in the @lionsdenkxip. Even afterwards it feels more like disbelief than disappointment. Thanks to all the fans even though you weren’t there. Next season, I promise 👊
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) November 1, 2020
आमचं चुकलंय- केएल राहुल
सामना पराभूत झाल्यानंतर कर्णधार केएल राहुलने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, “सामना न जिंकणे हे आमच्यासाठी दुर्दैवी होते. परंतु संघाचा अभिमान आहे. अपेक्षा आहे की, हा हंगाम विसरून पुढील वर्षी मजबूतीने येऊ. तुम्ही मागे पाहता, तेव्हा आमच्या खिशात अनेक सामने होते. परंतु आम्ही योग्य लाईनवर पोहोचू शकलो नाही. आमचं चुकलंय.”
“स्पर्धेच्या सुरुवातीला अनेक रोमांचक सामने आम्हाला विजयापासून दूर घेऊन गेले. आपण सर्व चुका करतो आणि आम्ही या हंगामात काही नवीन केले आहे. आम्हाला पराभव स्विकारणे, यामधून शिकणे आणि मजबूत होण्याची आवश्यकता आहे,” असेही राहुल पुढे म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-नाईकी ऐवजी आता ‘हा’ लोगो दिसणार टीम इंडियाच्या जर्सीवर
-अय्यरच्या दिल्ली सेनेला प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी द्यावी लागेल अग्निपरिक्षा, अशी आहेत समीकरणे
-IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
-सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ