कोरोना व्हायरसमुळे २९ मार्च रोजी होणारा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम १९ सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे पाहता आयपीएलचे आयोजन संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये करण्यात आले आहे. ५३ दिवस चालणाऱ्या आयपीएल २०२०चा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. आयपीएलचे सर्व सामने युएईतील दुबई, अबु धाबी आणि शारजाह या शहरात होणार आहेत.
२१-२२ ऑगस्टनंतर आयपीएलच्या सर्व फ्रंचायझी युएईला रवाना झाल्या आहेत. आयपीएलच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असलेले चाहते आयपीएलचे सगळे संघ युएईत नक्की कुठे राहत आहेत, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतील. या लेखात, आयपीएलचे संघ नक्की कोणत्या हॉटेलमध्ये राहत आहेत, याची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. List Of All Hotels In UAE Where IPL Teams Stayed
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- वाल्डोर्फ एस्टोरिया
विराट कोहलीच्या नेतृत्तवाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघ युएईच्या खूप महागड्या हॉटेलमध्ये राहत आहे. दुबईच्या पाम ज्युमिराह भागात असलेल्या सर्वात महागड्या हॉटेल्सपैकी एक वाल्डोर्फ एस्टोरिया हॉटेलमध्ये आरसीबी संघ थांबला आहे. या हॉटेलमध्ये एका दिवसाचे भाडे १ लाख ६० हजार रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
आयपीएलच्या १२ हंगामात एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेला आरसीबी यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. यापुर्वी २००९, २०११ आणि २०१६ या ३ आयपीएल हंगामात आरसीबीने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. परंतु, त्यांना एकदाही विजेतेपद जिंकण्यात यश आले नाही.
कोलकाता नाईट रायडर्स- द रिट्स कार्लटन
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये २वेळा विजेतेपद जिंकले आहे. शाहरुख खान नेहमी आपल्या संघाला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपुर्वी युएईला पोहोचलेल्या आपल्या संघासाठी त्याने अबुधाबीमधील द रिट्स कार्लटन हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे.
या हॉटेलमध्ये एका दिवसाचे भाडे १ लाखापासून ते १.२५ लाख रुपये इतके आहे. या हॉटेलची विशेषता ही आहे की, त्यांच्या स्वत:चा समुद्रकिनारा आहे. सोबतच ५७ एकरपर्यंत पसरलेली हिरवीगार बाग आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या हॉटेलचा अर्धा भाग केकेआर संघाने बुक केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स- पॅलेस डाऊनटाऊन
एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकणाऱ्या संघांच्या यादीत दिल्ली कॅपिटल्स संघाचाही समावेश आहे. त्यांनी आयपीएलच्या १२ हंगामात एकदाही अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली नाही. परंतु, इतर संघांप्रमाणे दिल्ली कॅपिटल्सदेखील आयपीएल २०२०मध्ये ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
हा संघ युएईतील दुबई शहरात असणाऱ्या पॅलेस डाऊन टाऊन हॉटेलमध्ये थांबला आहे. या आलिशान हॉटेलचे एका दिवसाचे भाडे १ लाख ते १.५ लाख रुपये इतके आहे.
किंग्स इलेव्हन पंजाब- सोफिटेल हॉटेल
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या सहमालकीचा किंग्स इलेव्हन पंजाब संघदेखील आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला नाही. २०१४साली त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. पण केकेआरने त्यांना विजयाचा स्वाद चाखू दिला नाही.
आयपीएलच्या इतर फ्रंचायझींप्रमाणे किंग्स इलेव्हन पंजाबदेखील युएईला पोहोचला आहे. त्यांचे हॉटेल आरसीबीच्या वाल्डोर्फ एस्टोरियो हॉटेलपासून केवळ ५०० मीटर दूर आहे. ते दुबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये राहत आहेत. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे ५५ हजार ते १ लाखापर्यंत आहे.
सनराइजर्स हैद्राबाद- रिट्स कार्लटन
युएईत समुद्राला लागून असलेल्या रिट्स कार्लटन हॉटेलमध्ये सनराइजर्स हैद्राबाद संघ थांबला आहे. या हॉटेलमध्ये एका दिवसाचे भाडे ५० हजार ते १ लाख रुपये इतके आहे. सनराइजर्स हैद्राबादने २०१६ साली अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
राजस्थान रॉयल्स- वन अँड ओनली द पाम
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात ट्रॉफी आपल्या नावावर करणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स संघ. दुर्दैवाने त्यांनतर ते एकदाही अंतिम सामन्यापर्यंतदेखील मजल मारु शकले नाहीत. आयपीएल इतर संघाप्रमाणे राजस्थान रॉयल्सदेखील काही दिवसांपुर्वी युएईला पोहोचला आहे.
युएईमध्ये हा संघ आलिशान हॉटेल्सपैकी एक असणाऱ्या वन अँड ओनली द पाम हॉटेलमध्ये थांबला आहे. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे ८० हजारपासून सुरु होते.
चेन्नई सुपर किंग्स- फाइव्ह स्टार ताज हॉटेल
आयपीएलचा दूसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्स हा जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलीफाजवळ असणाऱ्या फाइव्ह स्टार ताज हॉटेलमध्ये थांबला आहे. या हॉटेलच्या आसपासचा नजारा खूप सुंदर आहे. अशा या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे ५५ हजार ते ७० हजार रुपये इतके आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत ३ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. गतवर्षी मुंबई इंडियन्समुळे त्यांना चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकवाण्याचा मान मिळवता आला नाही.
मुंबई इंडियन्स- सेंट रेगिस साडियाट आयर्लंड रिसॉर्ट
आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. रोहित शर्माच्या नेतृत्त्वखालील या संघाचे फ्रंचायझी रिलायन्स ग्रुप संघाला सर्व सोई-सुविधा उपलब्ध करु देण्यात कसलीही कसर सोडत नाही. मुंबई इंडियन्स हा अबुधाबीतील सर्वात महागड्या हॉटेल सेंट रेगिस साडियाट आयर्लंड रिसॉर्टमध्ये थांबला आहे. या हॉटेलच्या एका दिवसाचे भाडे जवळपास १ लाख ते १.५० लाख रुपयापर्यंत आहे.
अशाप्रकारे मुंबई इंडियन्स आणि कोलताना नाईट रायडर्स हे संघ अबुधाबी मध्ये तर उर्वरित ६ संघ दुबईत थांबले आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा
-IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक
-१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
-पुरंदरचा धुरंधर घेणार सुरेश रैनाची जागा
-सुरेश रैनाच्या बाहेर जाण्याने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला लागणार ब्रेक
-आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा पुणेकर क्रिकेटर कोरोना पाॅझिटिव्ह