या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी, ३ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यामध्ये कसोटी मालिकेदरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज बाऊंसरचा तितकासा प्रभावी वापर करू शकणार नाहीत, जसा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने केला होता, असे ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने म्हटले आहे.
मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान वॅगनरने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच चिंतेत टाकले होते. वॅगनरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शॉर्ट लेंथच्या चेंडूंचा वापर केला आणि मालिकेत एकूण १७ विकेट्स घेतले होते. वॅगनरने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी फळीची कमजोरी चव्हाट्यावर मांडली होती.
भारतीय गोलंदाजांच्या वॅगनरप्रमाणे गोलंदाजी करण्याच्या शक्यतेवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत वेड म्हणाला, “संघ प्रयत्न करू शकतात. परंतु मला नाही वाटत की ते यशस्वी होतील. मला नाही वाटत की कोणीही त्याच्याप्रमाणे बाऊंसर टाकून धावा न देता विकेट काढू शकेल, जसे की त्याने केले.”
भारतीय क्रिकेट संघाला डिसेंबरमध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने २०१८मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. तरीही ऑस्ट्रेलियाचे २ दिग्गज खेळाडू स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर त्या मालिकेचा भाग नव्हते. आता स्मिथ आणि वॉर्नर संघात परतले आहेत, त्यामुळे ही कसोटी मालिका आणखी रोमांचक असणार आहे.
२०१८-१९ च्या भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाने मोलाची कामगिरी केली. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या घातक गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियातील परिस्थितीचा चांगला फायदा घेतला होता.
याबाबत वेड म्हणाला की, “माझा असा विश्वास आहे की आम्ही भारताकडून आणखी काही प्रयत्न पाहू. परंतु ही वॅगनरसारखी प्रभावी कामगिरी नसेल. तो बऱ्याच काळापासून अशी कामगिरी करत आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मी कधीही कोणत्या गोलंदाजाला इतक्या योग्यतेने बाऊंसर टाकताना पाहिलेले नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
-एकवेळी धोनीवर दंड ठोठावणारा पंचच आता म्हणतोय धोनी जगातील सर्वात हुशार क्रिकेटपटू
-सिक्सरकिंग मैदानावर परतण्यास उत्सुक; म्हणतो, ‘मला आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळायचे’
-आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी आता निवृत्तीनंतर एलपीएल मध्ये खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही






