शारजाह येथे रविवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल २०२०चा नववा सामना पार पडला. पंजाब संघाचा हा या हंगामातील तिसरा तर राजस्थान संघाचा हा दूसराच सामना होता. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंजाबने सुरुवातीला फलंदाजी करताना २० षटकात केवळ २ विकेट्स गमावत २२३ धावा केल्या.
पंजाब संघाला हा डोंगराएवढा स्कोर उभा करून देण्यात धुरंधर फलंदाज मयंक अगरवालने मोलाचा वाटा उचलला. त्याने सलामीला फलंदाजीला येत चौफेर फटकेबाजी केली आणि केवळ ५० चेंडूत १०६ धावांची अफलातून खेळी केली. यात त्याच्या १० चौकारांचा आणि ७ षटकारांचा समावेश होता. हे अगरवालचे केवळ या हंगामातील नव्हे तर त्याच्या पूर्ण आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठरले आहे.
या अतुलनीय शतकासह अगरवालने एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत शतक, विजय हजारे ट्रॉफीतील एका सामन्यात १५०पेक्षा जास्त धावा आणि रणजी ट्रॉफीत त्रिशतक ठोकणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला असा अनोखा विक्रम करता आला नाही.
भारतातील या स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या समजल्या जातात. अशा सर्वच स्पर्धात त्याने शानदार कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
यूएईतील ‘या’ मैदानावर गोलंदाजी? नको रे बाबा
काय लाजवाब कामगिरी केलीय! २०१९-२०मधील मयंकची आकडेवारी पाहून तुम्हीही असंच म्हणाल
‘या’ वीर खेळाडूची कामगिरी ऐकून तुम्हीही कराल कौतुकांचा वर्षाव, कुटुंबातील व्यक्तीचे…
ट्रेंडिंग लेख-
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज
सेहवाग, गेल, डिविलियर्स या दिग्गजांमध्येही आपले वेगळेपण जपणारा मॅक्यूलम
स्टार खेळाडूंचा होता भरणा, तरीही ‘या’ ५ कारणांमुळे हैदराबाद झाली चारीमुंड्या चीत






