भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) याचा आज(7 जुलै) 42वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्याच्या या विक्रमांची त्याच्या वाढदिवसानिमित्त आठवण काढली जात आहे.
सन 2004 ला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 530 पेक्षाही अधिक सामने खेळले. तसेच 17 हजांरापेक्षा अधिक धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला.
विशेष म्हणजे हा धोनीचा कारकिर्दीतील 350 वा वनडे सामना होता. त्यामुळे तो 350 वनडे सामने खेळणारा जगातील केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला होता. याआधी श्रीलंकेचा माजी दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकाराने 360 वनडे सामने यष्टीरक्षक म्हणून खेळला आहे.
विशेष म्हणजे संगकाराने त्याच्या कारकिर्दीत एकून 404 वनडे सामने खेळले आहेत. पण त्याने यातील 44 सामने केवळ फलंदाज म्हणून खेळले आहेत.
त्याचबरोबर धोनी 350 वनडे खेळणारा एकूण 10 वा क्रिकेटपटू तर भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने भारताकडून 350 पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत. सचिनने 463 वनडे सामने खेळले आहेत.
धोनीने 350 वनडे सामन्यांपैकी 3 सामने आशिया एकादश संघाकडून खेळले आहेत. तर त्याने भारताकडून 347 वनडे सामने खेळले आहेत.
#वनडेत सर्वाधिक सामने पुर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून खेळणारे खेळाडू-
360 – कुमार संगकारा
350 – एमएस धोनी
294 – मार्क बाऊचर
282 – एडम गिलख्रिस्ट
211- मोईन खान
#सर्वाधिक वनडे सामने खेळणारे क्रिकेटपटू –
463 – सचिन तेंडुलकर
448 – माहेला जयवर्धने
445 – सनथ जयसुर्या
404 – कुमार संगकारा
398 – शाहिद आफ्रिदी
378 – इंझमाम उल हक
375 – रिकी पाँटींग
356 – वासिम आक्रम
350 – मुथय्या मुरलीधरन
350 – एमएस धोनी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन
‘विराटला विश्रांतीची गरज नाही’, कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकाकडून पाठराखण