साल 2020 हे कायम स्मरणात राहिल असेच गेले आहे. या वर्षात कोरोना महामारीने जगभर थैमान घातले. त्यामुळे बर्याच क्रीडा सामन्याचे आयोजन रद्द करण्यात. त्यामुळे यंदा क्रिकेटचे सामने सुद्धा खूप कमी प्रमाणात खेळले गेले. पण तरी या वर्षात काही चांगले कसोटी सामनेही पाहायला मिळाले. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणार्या गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहिला मिळाला.
त्यामुळे आज आपण यावर्षी सर्वाधिक जास्त विकेट्स घेत फलंदाजांच्या मनात धडकी भरवणार्या गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
1. स्टुअर्ट ब्रॉड
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने 2020 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे या यादीत तो पहिल्या स्थानी आहे. स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर 8 कसोटी सामन्यात फलंदाजांच्या मनात भीती निर्माण करताना 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने एका सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
2. मिशेल सँटनर
कसोटी क्रिकेटमध्ये 2020 साली सर्वाधिक जास्त विकेट्स घेणार्या गोलंदाजांमध्ये मिशेल सँटनर दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधीत्व करताना 5 कसोटी सामन्यात 30 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यात आलेल्या मागील सामन्यात कारकिर्दीत 300 विकेट्स घेण्याचा टप्पा सुद्धा पार केला आहे. मिशेल सँटनर हा एकमेव फिरकीपटू यंदा यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणार्या पहिल्या 5 गोलंदाजांच्या यादीत आहे.
3. काइल जेमिसन
कसोटी क्रिकेटमध्ये 2020 साली सर्वाधिक जास्त विकेट्स घेणार्या या यादीत तिसर्या क्रमांकावर काइल जेमिसन आहे. त्याने 2020 मध्ये भारतीय संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधीत्व करताना 5 कसोटी सामन्यात 25 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. त्याचबरोबर आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सर्वांना प्रभावित केले होते.
4. जेम्स अँडरसन
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन 2020 मध्ये कसोटीत सर्वाधिक जास्त विकेट्स घेणार्या यादीत चौथ्या स्थानी राहिला. त्याने यंदा काही विशेष अशी काही कामगिरी केली नाही. तरी त्याने 23 विकेट्स घेतल्या. त्याची यावर्षीची सर्वोत्तम कामगिरी 40 धावा देवून 5 विकेट्स अशी होती.
5. ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा 2020 मध्ये सर्वाधिक कसोटीत विकेट्स घेणार्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने 2020 मध्ये 5 कसोटी सामने खेळताना 20 विकेट्स घेतल्या आहेत.
6. क्रिस वोक्स
साल 2020 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये क्रिस वोक्स सर्वाधिक विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज आहे. तो देखील 2020 साली 6 कसोटी सामने खेळताना 20 विकेट्स प्राप्त करण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
गुडबाय २०२०: धोनी-रैनासह या ५ दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर्षी घेतली निवृत्ती
शुबमन गिल, मोहम्मद सिराजला मिळाली सचिन तेंडुलकरकडून कौतुकाची थाप; म्हणाला…
मैदानावर शिवी देणं ‘या’ ऑसी क्रिकेटरला पडलं महागात, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठोठावला २५०० डॉलर्सचा दंड