१५ ऑगस्ट २०२० रोजी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला शेवटचा राम राम करताना लिहिले की, “सर्वांच्या प्रेमासाठी आभार. आज संध्याकाळी ७.२९ नंतर मला निवृत्त समजा.” धोनीच्या पुनरागमनाची वाट पाहणारे चाहते अचानक निवृत्तीची ही पोस्ट पाहून हक्केबक्के झाले.
पण तुम्हाला माहिती आहे का की, धोनीने त्याच्या निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट हा दिवस का निवडला असावा? या प्रश्नाचे उत्तर शोधताना चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावले असतील. पण, यामागील खरे कारण आहे धोनीचे ‘पहिले प्रेम’. MS Dhoni Announced His Retirement On 15th August Due To His First Love
चला तर जाणून घेऊयात, नक्की धोनीच पहिल प्रेम कोण आहे…
धोनीचे पहिले प्रेम –
धोनी त्याचे कुटुंब आणि क्रिकेट यापेक्षाही दूसऱ्या कोणत्यातरी गोष्टीवर खूप प्रेम करतो. ही गोष्ट म्हणजे, ‘भारत देश’. धोनीने अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमातून सिद्ध केले आहे की, त्याच्यासाठी भारत देशापेक्षा जास्त मोठे अजून काहीच नाही. म्हणूनच बहुदा धोनीने क्रिकेटव्यतिरिक्त भारतीय सैन्यामध्ये सेवा देण्याचा निर्णय घेतला होता.
विश्वचषकासाठी प्रेग्नेन्ट पत्नीजवळ थांबला नव्हता धोनी –
क्रिकेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, विश्वचषकासारख्या मोठ्या टूर्नामेंटला जास्त महत्त्व दिले जाते. राष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, आपल्या कारकिर्दीत एकदातरी आपल्या संघाला विश्वचषक जिंकून द्यावा. विश्वचषकात खेळण्यासाठी क्रिकेटपटू खूप मेहनत घेत असतात.
२०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यावेळी धोनी हा भारतीय विश्वचषक संघाचा कर्णधार होता. त्याचवेळी धोनीची पत्नी साक्षी धोनी ही प्रेग्नन्ट (गरोदर) होती. अशावेळी सहसा पती आपल्या पत्नीसोबत राहतो. पण, धोनीने विश्वचषकाला प्राथमिकता दिली होती. एवढेच नव्हे तर, धोनी वडील बनल्याची आनंदाची बातमी ऐकल्यानंतरही घरी परतला नव्हता. याविषयी बोलताना धोनी म्हणाला होता की, “यावेळी माझ्यासाठी माझा देश महत्त्वाचा आहे. बाकी सर्वजण माझी वाट पाहू शकतात.”
तो त्याच्या नवजात मुलीला जवळपास पावणे दोन महिन्यांनी भेटला होता.
भारतीय सैन्यदलात सामील झाला होता धोनी –
२०११ साली भारताला वनडे विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीसाठी ते वर्ष खूप विशेष होते. कारण, १९८३पासून तब्बल २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने विश्वचषक पटकावला होता. त्या ऐतिहासिक विजयानंतर धोनीला खूप सन्मान मिळू लागला. त्याला भारतीय सैन्यदलात लेफ्टनन्ट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले होते.
तसं तर, धोनीने एकदा म्हटले होते की, जर तो क्रिकेटपटू नसता. तर तो भारतीय सैन्यामध्ये सहभागी झाला असता. त्यामुळे स्वत:हून चालून आलेल्या संधीला तो कसे काय सोडेल. लेफ्टनन्ट कर्नल बनण्याचा सन्मान प्राप्त झाल्यानंतर धोनीनंतर ट्रेनिंग पूर्ण केली आणि गतवर्षी तो काश्मिर विक्टर फोर्ससोबत सहभागी झाला होता.
आर्मी यूनिफॉर्ममध्ये स्विकारला पद्मभूषण सन्मान –
भारतावरील धोनीच्या प्रेमाचे सर्वोत्तम उदाहरण पाहायचे झाले तर, २०१८मध्ये त्याला पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. तेव्हा धोनीने आर्मीचा यूनिफॉर्म घालून तो पुरस्कार घेतला होता. आर्मी यूनिफॉर्म घालून पुरस्कार घेण्यामागील कारण विचारले असता, धोनी म्हणाला होता की, “आर्मी यूनिफॉर्म घालून हा पुरस्कार घेतल्यामुळे माझा आनंद १० पटीने वाढला.”
याविषयी धोनीने सोशल मीडियावर लिहिले होते की, “जेवढे लोक वर्दी घालून देशाची सेवा करतात, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धन्यवाद. तुमच्या या त्यागामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या सर्व अधिकारांसह शांतपणे जगत आहोत.”
पुलवामा हल्ल्यानंतर आर्मी टोपी घालून खेळला होता वनडे सामना –
गतवर्षी पुलवामामध्ये भारतीय सैन्यातील एका आर्मी कॅम्पवर हल्ला झाला होता. त्यानंतर धोनीने रांची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात आर्मी टोपी घालून क्रिकेट खेळले होते. भारतीय संघाने भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी आर्मींची टोपी घातली होती. एवढेच नव्हे तर, धोनी आणि पूर्ण भारतीय संघाने त्यांच्या त्या वनडे सामन्याचे शुल्क शहिद लोकांच्या कुटुंबासाठी दान दिले होते.
ट्रेंडिंग लेख –
ज्या शहरात पोरं आयआयटी, जीईई, यूपीएससीचा अभ्यास करायची, तिथलं जगच धोनीने बदललं
यक्षप्रश्न- धोनीनंतर कोण? वाचा सविस्तर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केले टाटा बाय बाय परंतू या ७ व्यवसायातून धोनी करणार कोट्यावधीची कमाई
महत्त्वाच्या बातम्या –
जशा शुभेच्छा सेहवागने धोनीला दिल्या, तशा कुणीच देऊ शकलं नाही
गृहमंत्री अमित शहांनी धोनीच्या निवृत्तीवर केलं ट्विट, म्हणाले हेलिकॉप्टर शॉट….
७ महान क्रिकेटरने ७ नंबर फेव्हरिट असलेल्या धोनीला दिल्या ७ ट्विट करुन शुभेच्छा