मुंबई । भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपेक्षित असलेली छाप सोडता आली नाही. तथापि, हा खेळाडू अत्यंत हुशार आहे. यात शंका नाही. पंत हा धोनीचा उत्तराधिकारी मानला जात आहे. धोनी आणि पंतमधील मैत्रीपूर्ण संबंधही चांगले आहेत. अनेकदा पंत धोनीकडून मार्गदर्शन घेताना दिसत असतो.
नुकतेच दिल्लीच्या कॅपिटल्सशी खास बातचीत करताना पंतने धोनीला सर्वोत्कृष्ट फलंदाजी करणारा साथीदार असल्याचे सांगितले आहे.
आयपीएलमधील संघ दिल्ली कॅपिटल्सशी संवाद साधताना पंत म्हणाला की, ”माझा आवडता फलंदाज माही भाई, त्याच्यासोबत फलंदाजी करायला आवडते, परंतु त्याच्याबरोबर फलंदाजी करण्याची मला फारशी संधी मिळत नाही. जर तो मैदानावर असेल तर सर्व काही ठीक असते.”
“तो आपल्याला योजना सांगतो आणि आपण त्याचे अनुसरण केले पाहिजे. त्याची बुद्धी ज्याप्रमाणे काम करते ती खरोकरच कौतुकास्पद आहे. खासकरुन जेव्हा संघ लक्ष्यचा पाठलाग करीत असेल तेव्हा.”
याबरोबरच संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत फलंदाजी करायला आवडते असेही पंतनी सांगितले.
पंतने संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माचेही कौतुक केले आणि म्हटले की, “दोन्ही दिग्गज फलंदाजांसह फलंदाजी करायला मला आवडते. जेव्हा वरिष्ठ फलंदाजांसह फलंदाजी करतो तेव्हा एक वेगळा अनुभव येतो. त्यांच्याबरोबर खेळण्याचा आनंद आहे. याशिवाय श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांच्यासोबतही फलंदाजी करण्यात खूप मजा येते.”
पंत हा सध्या गाझियाबादमध्ये सुरेश रैनाबरोबर प्रशिक्षण घेत आहे. हे दोन्ही खेळाडू नेट्समध्ये फलंदाजीच्या अभ्यासाबरोबरच आपल्या तंदुरुस्तीवरही काम करत आहेत. पंतही आपल्या यष्टीरक्षण सुधारत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
दमदार कामगिरीनंतरही भारतीय संघातून हे खेळाडू झाले अचानक गायब
या मोठ्या कारणामुळे इंग्लंडने आर्चरला दिला दुसऱ्या कसोटीतून डच्चू
क्रिकेट तर होणारच! भारतीय संघाचे सराब शिबीर होणार ‘या’ देशात?