सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईला लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. तसेच, या पराभवासह चेन्नई सुपर किंगचे आयपीएल २०२० स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले असल्याचे बोलले जात आहे. हा सामना तसा एकतर्फीच झाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या संघाला या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र, एकूण सामन्यात कर्णधार एमएस धोनीने त्याचा स्वॅग कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.
सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या चेन्नई संघाने २० षटकात अवघ्या १२५ धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थानला पराभूत करण्यासाठी चेन्नईला क्षेत्ररक्षणात जीव ओतावा लागणार, हे निश्चित होते. आणि याच विचाराने मैदानावर उतरलेल्या धोनीने उत्तम यष्टीरक्षणाचे प्रदर्शन केले. यातच त्याने यष्टीमागे क्षेत्ररक्षण करताना घेतलेला एक झेल मात्र प्रेक्षकांच्या मनावर आता कायमच कोरलेला राहणार आहे.
धोनीने फक्त एकाच हाताने घेतला अफलातून झेल….
राजस्थान संघाची फलंदाजी सुरु असताना चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर ५ वे षटक टाकत होता. त्यावेळी त्याच्या समोर होता राजस्थानचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन. मात्र, चहरने टाकलेल्या तिसऱ्याच चेंडूवर या धडाकेबाज फलंदाजाला भोपळाही न फोडता तंबूत माघारी जावे लागले. याचे कारण होते एमएस धोनीने वाऱ्याच्या वेगाने चपळाई करत अवघ्या एका हाताने घेतलेला त्याचा अप्रतिम झेल.
https://twitter.com/AndMinnaar/status/1318227062906183698
https://twitter.com/prashantDocean/status/1318292927399956481
https://twitter.com/CoolAkshay_10/status/1318273193052835840
https://twitter.com/TheSikhBlood/status/1318226245960617984
एमएस धोनीने घेतलेला हा झेल इतका भन्नाट होता की, बाद झालेला फलंदाजापेक्षाही क्षेत्ररक्षण करणारे चेन्नईचे इतर खेळाडू आणि स्वतः गोलंदाज दीपक चाहर हा देखील अवाक् झाला होता. महेंद्र सिंग धोनीने यापुर्वी देखील यष्टीमागे असे अनेक अप्रतिम झेल घेतलेले आहेत. मात्र, राजस्थान विरुद्धच्या सामन्यातील हा झेल त्याच्या इतर झेलांपेक्षा नक्कीच वेगळा आणि आकर्षक होता.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी रिव्ह्यू सिस्टिम पुन्हा ऍक्टिवेट- पाहा कशी वाचवली अंबाती रायडूची विकेट
धोनीची निती वापरली धोनीलाच! संजू सॅमसनने असा केला धोनीचा गेम
‘तो’ रांगतही नव्हता तेव्हा वाॅटसनने सुरू केलेलं क्रिकेट, आज त्यानेच केली ‘दांडी गुल’
ट्रेंडिंग लेख-
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’