भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, जिथे हिंदी, इंग्रजी, मराठी यांव्यतिरिक्त कित्येक भाषा बोलल्या जातात. भारतातील महाराष्ट्र राज्यात तर कित्येकदा मराठी भाषेचा मुद्दा राजकीय ठरल्याचे आपण पाहिले आहे. त्यातही महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील सर्व लोकांनी मराठी बोलले पाहिजे, हा मुद्दा सतत पुढे येताना दिसतो. अशात भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पंड्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पंड्या मुंबई इंडियन्स संघाची जर्सी घालून बसलेला दिसत आहे. तसेच त्याच्या बाजूला सूर्यकुमार यादवदेखील बसलेला आहे.
पंड्या व्हिडिओत म्हणतो की, “काय म्हणताय. सगळ बर का? आमची मुंबई खूप खूप छान आहे. मी आता मराठी शिकणार आहे. मुंबईमध्ये आतापासून प्रत्येकानी मराठीतच सर्व गोष्टी करायला पाहिजेत. मलाही मराठी बोलता येते. एवढेच नाही तर मला मराठी समजतेदेखील. मी अजून मराठी बोलण्याचा सराव करणार आहे. सूर्यकुमार मला मराठी शिकवत आहे.”
विशेष म्हणजे, पंड्याच्या या जबरदस्त व्हिडिओला मुंबई इंडियन्सच्या ऑफिशियलने कमालीचे कॅप्शन दिले आहे. ‘कसं काय, हार्दिक भाऊ?’ असे हे कॅप्शन आहे.
कसं काय, Hardik भाऊ? 😜#OneFamily #MumbaiIndians @hardikpandya7 pic.twitter.com/uml9qvLFaS
— Mumbai Indians (@mipaltan) December 11, 2020
हार्दिक पंड्या आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
पंड्या सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिका संपली आहे. तर येत्या काही दिवसात कसोटी मालिका होईल. यातील वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ने विजयाची पताका झळकावली. तर भारतीय संघानेही २-१ने टी२० मालिका खिशात घातली. दरम्यान हार्दिक पंड्याने भारताच्या या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND Vs AUS A : सराव सामन्याचा पहिला दिवस बुमराहच्या नावावर, भारताला मिळाली ८६ धावांची आघाडी
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूला सोपवले कसोटी संघाचे कर्णधारपद
“…तर मग कर्णधाराची काय गरज?” इंग्लंड संघाच्या प्लेकार्ड रणनितीवर माजी खेळाडूची सडकून टीका