---Advertisement---

फ्रेंच ओपन: नाडियाने सेमी फायनलमध्ये प्रवेश करत रचला इतिहास

---Advertisement---

जागतिक क्रमवारीत 131 व्या क्रमांकावर असलेल्या नाडिया पोदोरोस्काने उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इलिना स्वितोलिनाला 6-2, 6-4 ने पराभूत केले. हा सामना एक तास 19 मिनिटे चालला. दुसर्‍याच ग्रँड स्लॅममध्ये खेळणारी नाडिया ओपन इरामध्ये (1968 नंतर) पात्रता फेरीतून येऊन फ्रेंच ओपनच्या अंतिम चारमध्ये प्रवेश करणारी पहिली महिला ठरली आहे. तर युक्रेनची स्वितोलीना अंतिम आठमधून बाहेर होण्याची ही तिसरी वेळ आहे.

आता इंगा स्विट्झेक विरुद्ध नाडियाचा उपांत्य फेरीतील सामना होईल. इंगा स्विट्झेकने मार्टिना ट्रेव्हिसनला 6-3,6-1 अशा फरकाने उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

फिलिपनंतर 23 वर्षानंतर नाडियाने केली ही कामगिरी

23 वर्षांपूर्वी पुरुष गटात बेल्जियमचा फिलिप डल्फ हा पात्रता फेरीतून फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर नाडियाने हा पराक्रम केला आहे.

सामन्यानंतर नाडिया म्हणाली, “माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते. मी खूप आनंदी आहे. क्वारंटाईन कालावधीत मी माझ्या प्रशिक्षकाबरोबर खूप मेहनत घेतली आणि त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकली.”

जोकोविच विरुद्ध त्सित्सिपास रंगणार सामना –

पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत बुधवारी(7 ऑक्टोबर) स्टिफानोस त्सित्सिपासने अँड्री रुब्लेवला 7-5,6-2,6-3अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत कारकिर्दीत पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या उपांत्यफेरीत धडक मारली. तर अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने पाब्लो कारेनो बुस्ताचा 4-6,6-2,6-3,6-4 असा 4 सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

त्यामुळे आता शुक्रवारी त्सित्सिपास विरुद्ध नोवाक जोकोविचमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगेल. तर उपांत्य फेरीचा दुसरा सामना राफेल नदाल विरुद्ध डिएगो श्वार्टझ्माएन यांच्यात होईल. नदालने उपांत्यपूर्व फेरीत जॅनिक सिन्नरचा तर श्वार्टझ्माएनने डॉमनिक थीमचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---