६३ वर्षांपुर्वी अर्थात १४ ऑगस्ट १९४८ला जागतिक क्रिकेटमध्ये नेहमी चर्चा होणारी एक घटना घडली.
या दिवशी सर डाॅन ब्रॅडमन हे आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात ० धावेवर बाद झाले. यामुळे त्यांची कसोटी क्रिकेटमधील सरासरी १०१.३९ वरुन ९९.९४वर घसरली.
9️⃣9️⃣.9️⃣4️⃣ #OnThisDay on 1948, Don Bradman's Test career came to an end.
Bowled for a duck in his final Test innings at The Oval, he finished four runs shy of 7000 in the longest format, with his average finishing 0.06 runs per dismissal below an even ???? pic.twitter.com/Jnrrfv91an
— ICC (@ICC) August 14, 2019
इंग्लंडमधील द ओव्हल मैनावर पार पडलेल्या या सामन्यात त्यांना १००ची सरासरी राखण्यासाठी केवळ ४ धावा करायच्या होत्या. त्या करुन ते बाद झाले असते तरीही त्यांची सरासरी १०० राहिली असती. किंवा एकही धाव न करता ते नाबाद राहिले असते तरीही त्यांची सरासरी १०१.३९ राहिली असती.
परंतु पहिला सलामीवीर बाद झाल्यावर ते फलंदाजीला आले आणि केवळ दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत झाले. त्यांना इरिक हाॅलिस या गोलंदाजाने बाद केले. तेव्हा ब्रॅडमन जेमतेम १ मिनीटे मैदानावर फलंदाजीला आले होते. इरिक हाॅलिसने टाकलेला हा चेंडू गुगली होता.
#OnThisDay in 1948, Sir Don Bradman walked out at The Oval for his final Test innings, needing just 4 runs to maintain an average over 100…
You know what happened next…
The most famous ???? in cricket history? pic.twitter.com/GoCZivgMyt
— ICC (@ICC) August 14, 2018
याच मैदानावर पुर्वी खेळताना त्यांनी इंग्लंडविरुद्ध २३२, २४४ आणि ७७ धावा केल्या होत्या. तसेच १९४८मध्येच त्यांनी सरेविरुद्ध खेळताना १४६ आणि १२८ धावांची खेळीही याच मैदानावर केली होती.
या सामन्यात फक्त ४ धावा करत त्यांना आपली ही सरासरी १०० राखण्याची गरज होती. पंरतु ज्या खेळाने ब्रॅडमन यांना सर्वकाही दिले तोच खेळ अखेरच्या सामन्यात मात्र त्यांच्यावर चांगलाच रुसला.
The rarest sight… #OnThisDay in 1948 the legendary Don Bradman was dismissed for 0 at the Oval v England pic.twitter.com/ezUF4ZPbTw
— ICC (@ICC) August 14, 2016
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा पहिला डाव केवळ ५२ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर ब्रॅडमन कर्णधार असलेल्या आस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३८९ धावा केल्या. याच डावात ब्रॅडमन ० धावेवर बाद झाले.
त्यानंतर तिसऱ्या डावातही इंग्लिश फलंदाजांना विशेष चमक दाखवता आली नाही आणि त्यांचा डाव १८८ धावांतच संपुष्टात आला. यामुळे चौथ्या दिवशीच ऑॅस्ट्रेलिया १ डाव आण १४९ धावांनी जिंकली.
ब्रॅडमन यांची कारकिर्द-
कसोटी सामने- ५२, डाव- ८०, धावा- ६९९६, सरासरी- ९९.९४
त्या सामन्यात जर त्यांनी खालील कामगिरी केली असती तर-
नाबाद राहिले असते तर- सरासरी १०१ पेक्षा जास्त राहिली असती
४ धावा केल्या असत्या आणि बाद झाले असते तर- सरासरी बरोबर १०० झाली असती
फलंदाजीलाच आले नसते तर- सरासरी १०१. ३९ राहिली असती.
वाचा –