इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्स संघाचा दमदार फलंदाज सुरेश रैनाने अचानक आयपीएल २०२० न खेळण्याचा निर्णय घेत सर्वांना चकित केले. अद्यापही रैनाच्या या निर्णयामागील खरे कारण पुढे आलेले नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, त्याने हा निर्णय कौटुंबिक कारणामुळे घेतला आहे.
रैनाच्या आयपीएल न खेळण्याच्या निर्णयाबाबत सीएसके संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनी म्हटले होते की, “रैनाला दर आयपीएल हंगामात ११ कोटी रुपये मिळतात आणि ही खूप मोठी रक्कम आहे. रैनाला लवकरच या गोष्टीची जाणीव होईल.” श्रीनिवासन यांच्या या विधानानंतर भारताचे माजी मेंटल कडिंशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी रैनाचे समर्थन करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. Paddy Upton Talks About Suresh Raina And Other IPL Players Own Will
ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना पॅडी म्हणाले की, “रैनासारख्या खेळाडूंसाठी पैसा नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आणि त्यांचे कुटुंब महत्त्वाचे असते. अशात इतर संघानीदेखील त्यांच्या खेळाडूंना समजून घ्यायला पाहिजे. रैनाने आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्याचा सन्मान व्हायला पाहिजे. त्याच्या आयपीएल सोडण्याच्या निर्णयानंतर पैसाच्या नुकसानाविषयी बोलणे सरळ सरळ चुकिचे आहे. जर कोणत्या खेळाडूला कोरोना व्हायरसच्या काळात आपल्या कुटुंबियांची काळजी वाटत असेल, तर तो पैशांची चिंता न करता आयपीएल सोडू शकतो.”
“दूसऱ्यांकडून प्रेरणा घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये संघर्ष करावा लागेल, तर जे खेळाडू स्वत:कडून प्रेरणा घेतात ते खूप चांगले खेळू शकतात. मोठ्या सामन्यांमध्ये खेळणारे खेळाडू त्यावेळी दबाव झेलू शकतात, जेव्हा त्यांच्या आजूबाजूला मोठ्या संख्येत लोक असतील. पण, यंदा रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल सामने होणार आहेत, त्यामुळे त्या स्तरावरचा दवाब असेल,” असे बोलताना पॅडी यांनी सांगितले.
“विराट कोहलीसारख्या मोठ्या सामन्यात दमदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना दर्शकांच्या गोंधळाविना आणि त्यांच्या प्रेरणेविना आपण कसे प्रदर्शन करु शकतो, हे पाहावे लागेल. तुम्हाला असे खेळाडू शोधावे लागणार आहेत, जे दबावाच्या परिस्थितीत सहसा चांगले प्रदर्शन करत नाहीत. दर्शकांविना ते दमदार प्रदर्शन करतील,” असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.