---Advertisement---

श्रीलंकेची शरणागती! इंग्लंडचा सुपर-8 मध्ये 51 धावांनी दणदणीत विजय

On: रविवार, फेब्रुवारी 22, 2026 6:24 PM
---Advertisement---

टी२० वर्ल्डकप २०२६च्या स्पर्धेतील सुपर ८ मधील दुसरा व आजचा (२२ फेब्रुवारी) पहिला सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला गेला, जो पाहुण्याने संघाने 51 धावांनी जिंकला. यामध्ये इंग्लंडने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ९ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या. यामुळे श्रीलंका सहज हे लक्ष्य पार करेल असे वाटत असताना यजमान संघ केवळ १६.४ षटकात ९५ धावांत सर्वबाद झाला.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात डळमळीत झाली असली तरी, फिल साल्टने महत्त्वपूर्ण अर्धशतकासह संघाला पुनरुज्जीवित केले. त्याने ६२ धावा केल्या आणि इंग्लंडला २० षटकांत १४६/९ असा संघर्षपूर्ण धावसंख्या उभारण्यास मदत केली. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालागे आणि दिलशान मदुशंका यांनी ३ आणि २ बळी घेत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

१४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे ढासळली. पॉवरप्लेमध्येच ५ बळी गमावल्यानंतर संघावर खूप दबाव आला. नियमित अंतराने विकेट पडत राहिल्याने, श्रीलंकेला पुनरागमन करता आले नाही आणि संपूर्ण संघ फक्त ९५ धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून विल जॅक्सने ३ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी २ बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचा कणा मोडला.
बातमी अपडेट होत आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---