मुंबई । गतविजेते इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेच्या तयारीसाठी पाकिस्तानचा संघ या महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये दाखल झाला. तो सध्या इंग्लंड दौर्यावर दुसर्या टप्प्यात आहे. कोविड 19 च्या ब्रेकनंतर त्यांची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे.
सामान्य प्रेक्षकांना असे वाटत असते की, क्रिकेटपटू विदेशी दौऱ्यात असताना खूप आनंद घेतात. परंतु पाकिस्तानच्या खेळाडूंचे प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे. कारण इंग्लंडमधील 3-स्टार हॉटेलमध्ये जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी पाकिस्तान संघाची व्यवस्था केली गेली आहे.
पाकिस्तानमधील एका वृत्तानुसार, 14 दिवसांच्या विलगीकरण कालावधीत संघाला वॉरेस्टरच्या एका 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्यास भाग पाडले गेले आणि त्यांना जेवणासाठी बाहेर देखील जाऊ दिले नाही. एकत्र बसून जेवण करु दिले नाही.
त्यांना इनडोअर खेळण्याची परवानगी आहे पण त्यांच्या संबंधित खोल्यांमध्ये. 30 जुलैपर्यंत संघ या शहरात राहील. त्याव्यतिरिक्त, डर्बीमध्ये मुक्काम करताना पाकिस्तानचा संघ दोन इंट्रा-स्क्वाड सामनेही खेळेल. पहिला 17 ते 20 जुलै दरम्यान असेल तर दुसरे 24 जुलैपासून सुरू होतील.
पाकिस्तानचा संघ इंग्लंड विरुद्ध तीन कसोटी आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. पहिली कसोटी 5 ऑगस्टपासून आणि टी -20 मालिका 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अझर अली पाकिस्तानच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे, बाबर आझम टी 20 मालिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहेत.
1 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा संघ मँचेस्टरला जाणार आहे, तिथे इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी सामना होणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मँचेस्टर आणि साऊथॅम्प्टनला याठिकाणास सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमान म्हणून निवडले आहे. कारण दोन्ही मैदानाजवळ एका हॉटेलमध्ये संघाची सोय करण्यात येणार आहे.