५ ऑगस्टपासून पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने २-१ ने विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंड संघातील खेळाडूंचा विश्वास दुप्पटीने वाढला आहे. अशात इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पूर्ण पाकिस्तान संघासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ‘स्पेशल गिफ्ट’ (विशेष भेट) पाठवले आहे. बकरी ईदच्या निमित्ताने तसेच पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी संघातील खेळाडूंचे मनोबल वाढण्यासाठी पीसीबीने हा मार्ग अवलंबला आहे.
हे स्पेशल गिफ्ट म्हणजे, संघासाठी नवा पांढऱ्या रंगाचा ड्रेस आहे, जो घालून खेळाडूंचा अभिमान वाढेल. या पांढऱ्या शर्टवर मागे हिरव्या रंगाने प्रत्येक खेळाडूचे नाव लिहिलेले आहे. जेव्हा ही भेट युवा खेळाडूंना मिळाली, तेव्हा त्यांचा आनंद गगनाला भिडण्याजोगा होता. सर्व खेळाडूंनी मिळून ती भेट देतानाचा एक व्हिडिओदेखील बनवला आहे.
The Pakistan Team Vlog!
We sent some special gifts for the Pakistan Cricket Team. Find out how they reacted! 🙌 pic.twitter.com/Z1ekVbzTa1
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 28, 2020
५ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यानंतर २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी पाकिस्तान संघ इंग्लंडला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सर्व खेळाडूंच्या २-२ कोरोना चाचणीही केल्या गेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-माजी खेळाडूने सांगितले मुंबई इंडियन्सच्या यशामागील रहस्य, म्हणतो आर्धी आयपीएल लढाई तर ते…
-‘गौतम गंभीरला अधिक सामन्यांत नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती, तर तो सर्वोत्तम कर्णधार बनला असता’
-दूसऱ्या वनडे सामन्यापुर्वी इंग्लंडला बसला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू झाला मालिकेतून बाहेर
ट्रेंडिंग लेख –
-जिगरी दोस्त असलेले क्रिकेटर झाले एकमेकांचे वैरी, पुढे…
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी