---Advertisement---

धोनीच्या रिटायरमेंटच्या नादात लोकं रैनाची रिटायरमेंट विसरले, माजी क्रिकेटरने ट्विटर करत…

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 11:25 AM
---Advertisement---

काल(१५ ऑगस्ट) भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्तीची घोषणा करुन ४० मिनीटंही झाली नाही तोच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण तोपर्यंत अनेकजण धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयातून सावरले नव्हते. त्यामुळे काहीप्रमाणात रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचे अनेकांच्या विस्मरणात गेले. याबद्दलती आठवण रैनाचा संघसहकारी आरपी सिंगने करुन दिली आहे.

त्याने रैनाच्या निवृत्तीनंतर ट्विट करत लिहिले की ‘कदाचित लोकं विसरले आहे की रैनासुद्ध निवृत्त झाला आहे. पण तो भारतातील एक चांगला क्रिकेटपटू होता. विशेषत: मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्यासारखे खूप कमी क्रिकेटपटू आहेत. त्याला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा.’

सुरेश रैना भारताकडून १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळला असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ७९८८ धावा केल्या आहेत. रैनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १७ जुलै २०१८ रोजी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---