गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना झाला. यात प्रथम फलंदाजी करत हैदराबादने २०१ धावांचा डोंगर उभा केला. याच सामन्यात सनरायझर्सचा सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रोचे शतक केवळ ३ धावांनी हुकले.
प्रथम फलंदाजी करताना डेविड वॉर्नर व जॉनी बेयरस्टो जोडीने १५.१ षटकांत १६० धावांची सलामीला भागीदारी केली. यात एकट्या बेयरस्टोने ९७ धावा केल्या. वॉर्नरला बाद करत रवी बिष्णोईने ही भागीदारी मोडली. तर बेअरस्ट्रोलाही त्याने त्याच षटकात बाद केले.
हे शतक झाले असते तर बेअरस्ट्रोचे हे आयपीएलमधील दुसरे शतक ठरले असते. यापुर्वी दिल्ली कॅपिटल्सचा रिषभ पंत गुजरात लायन्स संघाविरुद्ध ९७ धावांवर बाद झाला होता. बेअरस्ट्रोने आजच्या या धमाकेदार अर्धशतकी खेळीत ५५ चेंडूत ९७ धावा केल्या होत्या. यात त्याने ७ चौकार व ६ षटकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या-
-करुन दाखवलं! वॉर्नरने आयपीएलमध्ये जे केलंय ते ना विराट ना रोहितला जमलंय
-केदार जाधवची सीबीआय चौकशी करा, चाहत्यांनी केली अजब मागणी
-दुःखद ! आर अश्विनच्या संघसहकाऱ्याने घेतला जगाचा निरोप
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक