संपुर्ण नाव- पार्थिव अजय पटेल
जन्मतारिख- 9 मार्च, 1985
जन्मस्थळ- अहमदाबाद, गुजरात
मुख्य संघ- भारत, चेमप्लास्ट, चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, ड्रविड एकादश, एलाइट सी, गुजरात, गुजरात अध्यक्षयी एकादश, 16 वर्षांखालील गुजरात, भारत अ, भारत ब, इंडिया इमर्जिंग प्लेयर, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, वरिष्ठ भारतीय संघ, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भरतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, कोची टस्कर्स केरळ, मुंबई इंडियन्स, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, शेष भारतीय संघ, 19 वर्षांखालील शेष भारतीय संघ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पश्चिम विभाग आणि 19 वर्षांखालील पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इग्लंड, तारिख – 8 ते 12 ऑगस्ट, 2002
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 4 जानेवारी, 2003
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 4 जून, 2011
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 25, धावा- 934, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 38, धावा- 786, शतके- 0
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 36, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-पार्थिव पटेल यांचा जन्म गुजरातमधील एका मध्यवर्गीय कुंटुंबात झाला होता.त्याला किंजल नावाची मोठी बहीण आहे.
-पार्थिवने त्याची लहानपणापासूनची मैत्रिण अवनी झवेरी हिच्याशी त्याच्या 23व्या वाढदिवशी म्हणजे 9 मार्च 2008 रोजी लग्न केले. अवनी ही डिझाइनर आहे. त्यांना वेनिका नावाची मुलगी आहे.
-पार्थिव हा यष्टीरक्षक असल्याने त्याचे आदर्श ऑस्ट्रलियाचे माजी यष्टीरक्षक अॅडम गिलक्रिस्ट हे आहेत.
-वयाच्या 14व्या वर्षी जामनगर येथील एका कॅम्पमध्ये यष्टीरक्षणाचा सराव करताना पार्थिवला बाउन्सरपेक्षा फिरकीपटूचा चेंडू पकडणे सोपे जायचे.
-पार्थिवने वयाच्या 14व्या वर्षी पहिल्यांदा यष्टीरक्षणासाठी हातमोजे विकत घेतले होते. त्याने 700 रुपयांना एसजी टूर्नामेंटचे हातमोजे विकत घेतले होते.
-त्याने ऑगस्ट 2002ला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय यष्ट्रीरक्षक फलंदाज अजय रात्रा यांना दुखापत झाल्याने पार्थिवला संधी मिळाली होती.
पदार्पणाच्या वेळी तो 17 वर्षे 152 दिवसांचा असल्याने कसोटी इतिहासातील युवा यष्टीरक्षक ठरला होता. त्याच्यापुर्वी 17 वर्षे 300 दिवसांच्या वयात कसोटीत पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानी यष्टीरक्षक हानिफ मोहम्मदचा विक्रम त्याने मोडला होता.
-यावेळी पार्थिवने इंग्लंडचा फलंदाज नासेर हुसेन याचा यष्टीमागे झेल सोडला होता. तेव्हा त्याच्या अवघ्या 10 धावा झाल्या होत्या. मात्र, त्याला पुढे संधी मिळाल्याने नासेरने शतक ठोकले होते.
-पार्थिवची पावले संघात पडताच भारताला 2002 साली लंडनमध्ये विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेंचुरी पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे त्याला संघाचा शुभंकर असे म्हटले जाऊ लागले.
-पार्थिवने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदा वेस्ट इंडिजचा फलंदाज रामनरेश सर्वन यांना यष्टीचीत केले होते.
-2004 साली जेव्हा पार्थिव संघात नवीन होता, त्यावेळी बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू क्रिकेटपटू स्टिव्ह वॉग यांना अपशब्द वापरून त्यांचे लक्ष भटकवण्याचा प्रयत्न केला होता. तो कसोटी सामना वॉग यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. पार्थिवला सामन्यानंतर त्याच्या या नकोश्या वागणुकीसीठी बोलणे ऐकावे लागले होते.
-2004 साली लाहोरमधील भारत वरुद्ध पाकिस्तानच्या कसोटी सामन्यात पार्थिवला आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.2चे उल्लंघन केल्याने सामना फीच्या 60टक्के दंड ठोठावण्यात आला होता. तो प्रत्येक चेंडूनंतर विनाकारण आवाहन करत असल्याने त्याच्यावरती हा दंड आकारण्यात आला होता.
-2003सालच्या आयसीसी विश्वचषकाचा भाग असणाऱ्या पार्थिवला त्याकाळात प्रसिद्ध असणाऱ्या एमटीव्हीवरील बाक्रा शोने वेड्यात काढले होते. त्यांनी त्याला एका कठीण परिस्थित अडकवून तो त्याचा कशा प्रकारे सामना करतो यावरून त्याचे हसू केले होते.
-2004सालच्या कसोटीनंतर पार्थिवला 4 वर्षे वाट पाहावी लागली होती. पुढे 2008साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतून त्याने पुनरागमन केले होते. यावेळी त्याला फलंदाजीची संधी मिळाली होती, पण त्याने यावेळी अवघ्या 14 धावा केल्या होत्या.
-2010 साली न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेपासून मात्र त्याने अर्धशतके ठोकत चांगली फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण, 2011-12 साली त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना खेळला.
-मोहालीतील इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला दुखापत झाली होती. त्यामुळे 8 वर्षांनंतर त्याला कसोटीत पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने 83 कसोटी सामने गमावले होते.
-2015-16च्या विजय हजारे ट्रॉफी हंगामात पार्थिव गुजरात संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरातने दिल्लीविरुद्धचा अंतिम सामना जिंकला होता. त्याने अंतिम सामन्यात शतक ठोकले होते.
-त्याने 5 संघाकडून आयपीएल खेळले होते. यात चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, सनराइजर्स हैद्राबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सचा समावेश होता.