---Advertisement---

कपिल देव यांच्या सल्ल्याने ‘द वॉल’ राहुलचे बदलले आयुष्य अन्यथा…

On: रविवार, जुलै 19, 2020 5:46 PM
---Advertisement---

मुंबई । ‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने भारताकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 2012 साली तो क्रिकेटमधून निवृत्त झाला. निवृत्तीनंतर तो प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत आहे. दरम्यान, राहुल द्रविड निवृत्तीनंतर प्रशिक्षक कसा झाला याचा खुलासा केला आहे.

द्रविड म्हणाला की, महान अष्टपैलू कपिल देव यांच्या सल्ल्याने निवृत्तीनंतर त्यास पर्याय शोधण्यात मदत झाली आणि त्यानंतर त्याने भारत ‘अ’ आणि 19 वर्षांखालील संघांची प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. तसेच करिअरच्या शेवटी इंडियन प्रीमियर लीगमधील संघ राजस्थान रॉयल्समध्ये कर्णधार आणि सह-प्रशिक्षकाची भूमिका निभावत तो होता.

द्रविडने  ‘इनसाइड आउट’ या यूट्यूब चॅनलवर भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांना सांगितले की, ”मी खेळणे थांबवल्यानंतर (निवृत्त झाल्यानंतर) फार काही पर्याय उपलब्ध होते आणि मला काय करावे लागेल याची खात्री नव्हती. कपिल देव यांनीच मला सल्ला दिला. मी त्यांना कुठेतरी भेटलो आणि ते म्हणाले, राहुल सुरुवातीला काही करु नकोस, प्रथम बघ आणि वेगवेगळ्या गोष्टी कर आणि मग तुला खरोखर काय आवडते ते पहा. मला वाटले की, हा एक चांगला सल्ला आहे.”

माजी कर्णधार द्रविडने सांगितले की, “सुरुवातीला मला समालोचन करणे आवडायचे, परंतु नंतर असे वाटले की, मी खेळापासून थोडा दूर आहे. मला सर्वात समाधानकारक वाटते ते म्हणजे खेळाशी जोडलेले राहणे आणि खेळाडूंच्या संपर्कात रहाणे. मला प्रशिक्षणासारख्या गोष्टी आवडल्या आणि मला संधी मिळाली तेव्हा मी भारत ‘अ’ आणि 19 वर्षांखालील संघात सामील झालो.”

तो म्हणाला, ‘मला वाटले की ही चांगली सुरुवात आहे आणि मी ते स्वीकारले आणि आतापर्यंत मी याचा आनंद घेतला आहे. मला प्रशिक्षणामध्ये अधिक समाधानकारक वाटले. विशेषत: भारत अ संघ, 19 वर्षांखालील संघ किंवा एनसीए (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) यामुळे मला बर्‍याच खेळाडूंबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्वरित निकालाबद्दल मला चिंता वाटली नाही.”

भारताकडून खेळताना 1996 ते 2012 दरम्यान झालेल्या 164 कसोटी सामन्यात 13,288 धावा करणारा या दिग्गज फलंदाजाने युवा खेळाडूंना केवळ एक 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजेच एक 19 वर्षांखालील विश्वचषक खेळल्यानंतर त्या खेळाडूला पुढचा १९ वर्षांखालील विश्वचषक खेळता येणार नाही. द्रविड सध्या बंगळुरुमधील एनसीएचा क्रिकेटप्रमुखही आहे.

या कार्यक्रमात राहुल द्रविडने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक टप्प्याबद्दलही सांगितले. द्रविड म्हणाला, ”मला 1998 मध्ये वनडे क्रिकेटमधून वगळण्यात आलं होतं. मला परत येण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. त्यानंतर मी एक वर्ष भारतीय क्रिकेट संघाबाहेर होतो. मी विचार करण्यास सुरुवात केली की वनडे क्रिकेट खेळण्याची खरोखरच पात्रता आहे की नाही.”

‘भारतात क्रिकेटपटू होणे सोपे नव्हते. आमच्या काळात फक्त रणजी करंडक आणि भारतीय संघ होता. आयपीएल नव्हते आणि रणजी ट्रॉफीमध्ये मिळालेला पैसा फारच कमी होता. आव्हानेही कठीण होती आणि क्रिकेट निवडल्यानंतर अभ्यास सोडावा लागला. मी अभ्यासातही वाईट नव्हतो आणि क्रिकेटशिवाय इतर काहीही आरामात करू शकत होतो.’

वनडे स्वरुपात द्रविडचा स्ट्राइक रेटही कमी होता. यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते, पण द्रविडने वनडेमध्ये पुनरागमन केले आणि 1999 च्या विश्वचषकात सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दमदार धावा केल्या, त्या विश्वचषकामधील तो भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

सचिन, सेहवाग व द्रविडमुळे टीम इंडियात टिकलो नाही, नाहीतर नक्कीच….

कमबॅकसाठी धडपडत असलेले ते दोघे शमीच्या फार्महाऊसवर गुपचुप सराव करुन गेले

‘तो मैदानात उतरेल आणि स्वत:ला सिद्ध करेल’, सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---