---Advertisement---

‘तो मैदानात उतरेल आणि स्वत:ला सिद्ध करेल’, सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास

On: रविवार, जुलै 19, 2020 5:08 PM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला संधी देण्यात आलेली नव्हती, त्यानंतर तो खूप चिडला. मात्र, दुसर्‍या कसोटीत त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी (१७ जुलै) सचिनने ब्रॉडसाठी ट्विट केले. सचिनला विश्वास आहे की, स्टुअर्ट ब्रॉड पुन्हा एकदा स्वत: ला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे आणि तो आणखी चांगली कामगिरी करेल.

सचिन तेंडुलकरने ट्वीटमध्ये लिहिले की, “स्टुअर्ट ब्रॉडमध्ये खूप आत्मविश्वास आहे, मला वाटते की तो मैदानात उतरेल आणि स्वत: ला सिद्ध करेल.”

सचिनसह चाहत्यांनीही ब्रॉडच्या पुनरागमनाबद्दल आशा व्यक्त केली होती.

पहिल्या कसोटीमधून वगळल्यानंतर ब्रॉडने स्काय स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात सांगितले होते की, “मी संघात नसल्याची माहिती या सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता मला मिळाली. या परिस्थितीत अतिरिक्त वेगवान गोलंदाजांसोबत जाण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवले होते. मी निराश, संतप्त झालो. कारण हा निर्णय समजणे फार कठीण आहे. मी गेल्या दोन वर्षांत बहुधा सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. मी ऍशेससाठी संघात होतो आणि मी दक्षिण आफ्रिकेलाही गेला आणि जिंकलो.”

ट्रेंडिंग घडामोडी – 

अझरुद्दीनच्या पत्नीमुळे प्रेक्षकांशी भिडला होता हा पाकिस्तानी खेळाडू; कोर्टामध्ये गेले होते प्रकरण

ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का! या माजी कर्णधाराचे झाले निधन

अखेर बकनरने कबूल केले; माझ्या त्या दोन चुका भारताला नडल्याच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---