---Advertisement---

अझरुद्दीनच्या पत्नीमुळे प्रेक्षकांशी भिडला होता हा पाकिस्तानी खेळाडू; कोर्टामध्ये गेले होते प्रकरण

On: रविवार, जुलै 19, 2020 4:54 PM
---Advertisement---

१९९७ साली टोरंटो येथे ‘आलू’ म्हटल्यानंतर पाकिस्तानचा माजी दिग्गज फलंदाज इंझमाम उल हक चांगलाच संतापला होता, त्या घटनेची चर्चा आजही चाहते आणि क्रिकेटपटू करतात. इंझमामची शरीरयष्टी भरभक्कम होती आणि त्याची शारीरिक हालचाल सुस्त दिसायची, त्यामुळे त्याचे नाव ‘आलू’ पडले होते. ही गोष्ट नक्कीच निंदनीय आहे आणि इंझमामने त्यावेळी आपला राग प्रेक्षकांना दाखविला होता आणि तो हे सर्व स्विकारत नाही असा संदेश दिला होता.

मोहम्मद अझरूद्दीनच्या पत्नीबद्दल टीका

ही घटना २३ वर्षांपूर्वी भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान झाली होती. परंतु आता वकार युनूसने त्या घटनेबद्दल एक वेगळाच खुलासा केला आहे. युनूसनुसार, खरंतर इंझमानने जे काही केले, ते त्याला ‘आलू’ म्हटल्यामुळे नाही तर मोहम्मद अझरूद्दीनच्या पत्नीबद्दल वाईट वक्तव्य केल्यामुळे केले होते.

युनूस म्हणतो- ‘आलू’ म्हटल्यामुळे नव्हता भडकला इंझमाम

“होय, कोणतातरी व्यक्ती इंझमामला ‘आलू’ म्हणत होता. परंतु खरंतर झाले असे होते की गर्दीमध्ये कोणीतरी होते, जो अझरूद्दीनच्या पत्नीबद्दल वाईट कमेंट करत होता. मला वाटते की खूप जास्तच वाईट बोलत होता. हे खरंतर इंझमामला आवडत नसायचे. जसं की मी म्हणत होतो, भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये मैदानाबाहेर चांगली मैत्री होती, ते एकमेकांचा आदर करायचे,” असे ‘द ग्रेटेस्ट रायवलरी’ या पॉडकास्टमध्ये युनूसने म्हटले.

भारत- पाकिस्तान संघाच्या मैत्रीचे उदाहरण

युनूसने पुढे खुलासा करत म्हटले की भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंमधील दाट मैत्रीमुळे इंझमाम प्रेक्षकांशी भिडला होता.

“तुम्हाला माहीत आहे की आम्ही मैदानावर खूप मेहनत घ्यायचो. परंतु जेव्हा मैत्रीची गोष्ट येते, तेव्हा आम्ही खरंतर एकमेकांना सहकार्य करायचो,” असे युनूस म्हणाला.

इंझमाम बॅट घेऊन प्रेक्षकांना भिडला होता

त्या घटनेला उजाळा देत युनूस म्हणाला, “जे काही झाले ते प्रामाणिकपणे मला फार काही माहीत नाही. परंतु कोणीतरी अझरूद्दीनच्या पत्नीबद्दल वाईट वक्तव्य करत होता आणि तेव्हा इंझमामने कर्णधार रमीझ राजाला म्हटले की तो त्याला थर्ड मॅनच्या ठिकाणी उभे करावे आणि मग तो तिथे गेला होता. त्याने १२ व्या खेळाडूला बॅट आणण्यासाठी सांगितले होते. त्याने बॅट आणून दिली, त्यानंतर इंझमाम पायऱ्यांवर चढला आणि मारामारी करताना प्रेक्षकाला खाली पाडून आपला राग व्यक्त केला.”

मोहम्मद अझरूद्दीनच्या हस्तक्षेपाने प्रकरण सुटले

“इंझमामला शिक्षा भोगावी लागली होती. त्याला माफी मागावी लागली आणि तो त्या विशेष घटनेसाठी न्यायालयात गेला आणि अझरूद्दीनला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. त्याने कमेंट करणाऱ्या भारतीय व्यक्तीशी चर्चा केली त्यानंतर हा मुद्दा न्यायालयाच्या बाहेरच सुटला,” असे युनूस पुढे म्हणाला.

“जे काही झाले ते दुख:द आणि खूप वाईट होते. परंतु मला इथे काय म्हणायचंय, तुम्हाला माहीत आहे की जेव्हा एकमेकांच्या सहकार्याची गोष्ट येते, तेव्हा दोन्ही संघातील असे काही खेळाडू असतात, जे खरंतर एकमेकांच्या सहयोगाला महत्त्व देतात.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-बॅगी ग्रीन- कहानी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट कॅपची

-हे ३ संघ जिंकू शकतात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

-सप्टेंबरनंतर टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार नाही तो लोगो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---