मुंबई । 2000 या वर्षात अनेक वाईट घटनांना जगाला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स या विमानाची दुर्घटना झाली. यात 107 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या दुर्घटनेत पाकिस्तानचा क्रिकेटपटू यासीर शहा याचा देखील मृत्यू झाल्याची अफवा पसरली.
सदर विमान लाहोर ते कराची असा प्रवास करत असताना कराची येथील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ ही घटना घडली. विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या विमानातून यासिर शहा हा देखील प्रवास करत होता. ही घटना घडल्यानंतर अनेकांनी यासीर शहाच्या मृत्यूची सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली.
https://twitter.com/SOHAILAHMADBHA3/status/1263875654040289281
मृत्यूच्या अफवा पसरल्यानंतर यासीर शहाने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तो घरी सुरक्षित असल्याची माहिती लोकांना दिली आणि तो कराची विमान यात्रेत प्रवास करत नसल्याचे सांगितले. विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांना त्याने श्रद्धांजली देखील वाहिली. पण यासीर शहाने काही वेळातच हे ट्विट डिलीट करून टाकले. आणि दुसरे ट्विट केले.
https://twitter.com/BilalAh48344244/status/1263959314647130120?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1263959314647130120&ref_url=https%3A%2F%2Fkhabar.ndtv.com%2Fnews%2Fcricket%2Fcricketer-yasir-shah-did-not-die-in-pakistan-plane-crash-hindi-2233989
मी घरामध्ये सुरक्षित आहे त्यामुळे सर्वात ताकदवर असलेल्या देवाचे आभार मानतो. तसेच त्याने विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजलीही वाहिली.
यासीर शहाने त्याचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध फेब्रवारी महिन्यात खेळला होता. नुकतेच तो पाकिस्तान सुपर लीगमध्येही पेशावर जाल्मी संघाकडून खेळत होता. पाकिस्तानचा संघ ऑगस्टमध्ये कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. हा दौरा झाल्यास लवकरच तो मैदानात पुन्हा अॅक्शनमध्ये आपल्याला दिसेल.