मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कारकिर्दीत अनेक विक्रम केले. त्याच्या कामगिरीने क्रिकेटमध्ये एक वेगळा स्थर गाठला. त्याचमुळे अनेकांसाठी सचिन हा आदर्श आहे. याच सचिन तेंडुलकरने १० वर्षांपूर्वी एक निर्णय घेतला होता. तो म्हणजे वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा.
सचिन १८ मार्च २०१२ रोजी वनडे क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला. हा सामना सचिन पाकिस्तान संघाविरुद्ध ढाक्याच्या शेर ए बांगला स्टेडिअमवर शेवटचा सामना खेळला. हा २०१२ सालच्या आशिया कप स्पर्धेतील सामना होता. भारताने पाकिस्तानविरुद्धचा हा सामना ३२९ धावांचा पाठलाग करताना ६ विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात सचिनने ४८ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. तर सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने १४८ चेंडूत १८३ धावा केल्या होत्या.
हा सामना सचिनच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल असे तेव्हा कुणालाही वाटले नव्हते. कारण सचिनने यानंतर २३ डिसेंबर २०१२ रोजी वनडेतील निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर बरोबर १ वर्षांनी सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील निवृत्त झाला. आशिया कप २०१२ची अंतिम फेरी गाठण्यात मात्र भारताला यावेळी अपयश आले होते.
सचिनने त्याच्या वनडे कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली. त्याने त्याच्या कारकिर्दीत ४६३ वनडे सामने खेळले. यात त्याने १८४२६ धावा केल्या. तसेच वनडेत त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतके झळकावली. तो वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक सामने खेळणारा, सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतके करणारा क्रिकेटपटू देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मराठीत माहिती- क्रिकेटर एकनाथ सोलकर
काय आहे एमएस धोनीच्या ‘जर्सी नंबर- ७’चे रहस्य? खुद्द ‘माही’नेच केलाय खुलासा