24 जानेवारीपासून भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारताच्या या दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने होणार आहे. तर दौऱ्याचा शेवट कसोटी मालिकेने होईल. 24 जानेवारी ते 4 मार्च असा हा मोठा दौरा आहे.
टी20 विश्वचषकापुर्वी टी20 मालिकांपैकी भारतीय संघ ५ सामन्यांची एकमेव टी20 मालिका खेळत आहे. ही भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिलीच टी20 मालिका आहे. तसेच या दौऱ्यातील कसोटी मालिका ही टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असतील.
असा असेल भारताचा न्यूझीलंड दौरा – जानेवारी-मार्च 2020
टी20 मालिका –
24 जानेवारी – पहिला टी20 सामना – इडन पार्क, ऑकलंड
26 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इडन पार्क, ऑकलंड
29 जानेवारी – तिसरा टी20 सामना – सेडन पार्क, हॅमिल्टन
31 जानेवारी – चौथा टी20 सामना – वेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टन
2 फेब्रुवारी – पाचवा टी20 सामना – बे ओव्हल, तौरंगा
वनडे मालिका –
5 फेब्रुवारी – पहिला वनडे – सेडन पार्क, हॅमिल्टन
8 फेब्रुवारी – दुसरा वनडे – इडन पार्क, ऑकलंड
11 फेब्रुवारी – तिसरा वनडे – बे ओव्हल, तौरंगा
कसोटी मालिका –
21 – 25 फेब्रुवारी – पहिली कसोटी – बासिन रिसर्व, वेलिंग्टन
29 – 4 मार्च फेब्रुवारी – दुसरी कसोटी – हॅगली ओव्हल, ख्रिस्टचर्च
बीसीसीआयने करारबद्ध न केलेल्या धोनीला या ७ गोष्टीतून मिळणार तब्बल १३६ कोटी
वाचा👉https://t.co/tChPzC2qm1👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020