मुंबई । पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदीने 37 चेंडूत शतक ठोकले होते. त्यावेळी हे सर्वात वेगवान वनडे शतक होते. हा विक्रम जवळपास 18 वर्ष आफ्रिदीच्या नावावर होता. सध्या वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. 2015 मध्ये त्याने 31 चेंडूत शतक ठोकले होते.
श्रीलंकेविरूद्ध आफ्रिदीने 40 चेंडूंत 104 धावा फटकावल्या. या दमदार खेळीनंतर तो जगप्रसिद्ध झाला. पण बऱ्याच कमी लोकांना हे माहित आहे की त्याने ही खेळी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या बॅटने ती खेळी केली होती. खरंतर सचिनने आपली बॅट वकार युनूसला भेट दिली. शाहिद आफ्रिदीबरोबर खेळलेला अझर मेहमूद म्हणतो की, या खेळीनंतर आफ्रिदी पूर्ण फलंदाज बनला.
महमूद यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, “आफ्रिदीने 1996 मध्ये नैरोबीमध्ये पदार्पण केले होते. त्याच सामन्यातही मी पदार्पण केले. त्या मालिकेत मुश्ताक अहमद दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्याऐवजी मला घेण्यात आले.”
तो म्हणाला की, “श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसूर्या आणि यष्टीरक्षक कुलविथरन त्यावेळी खूप आक्रमक फलंदाज मानले जात होते. यामुळे आम्हाला तिसर्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजाची आवश्यकता होती. वसीम अक्रमने मला आणि आफ्रिदीला नेटवर सराव करण्यास सांगितले. आफ्रिदीने नेटमध्ये स्पिनर्सची चांगली धुलाई केली.”
दुसर्या दिवशी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सलामीचा फलंदाज सलीम इलाही बाद झाल्यावर पाकिस्तानची धावसंख्या एक बाद 60 अशी होती. यानंतर आफ्रिदीला तिसर्या क्रमांकावर पाठविण्यात आले आणि त्याने 37 चेंडूत 11 षटकार, 6 चौकारांसह शतक ठोकले. तेंडुलकरने गिफ्ट म्हणून दिलेल्या बॅटच्या सहाय्याने आफ्रिदीने ती खास खेळी केली होती. यानंतर तो पूर्ण फलंदाज बनला. त्याची कारकीर्द उत्कृष्ट होती.
“शाहिद आफ्रिदीने विशेषत: २०११ च्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली. तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. आफ्रिदीही चांगली गोलंदाजी करत होता. त्याने अब्दुल कादिरकडून एक असा चेंडू फेकायला शिकला जो थेट पॅड मधून यष्टीवर जाऊन आदळायचा. आफ्रिदीसाठी हा विश्वचषक चांगला राहिला परंतु दुर्दैवाने ते भारताकडून पराभूत झाले,” असे अझर महमूदने सांगितले.