आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यासाठी आता १५ दिवसांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्व संघातील खेळाडू जोरदार तयारीला लागले आहेत. अशात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू सिद्धेश लाडने वेस्ट इंडिजचा घातक फलंदाज आंद्रे रसलबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्याला नेट्समध्ये सराव करत असताना रसलला गोलंदाजी करायची नाही, असे त्याने सांगितले आहे.
मुंबईचा रहिवासी सिद्धेश हा यंदा आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा भाग आहे. आयपीएलच्या इतर संघांप्रमाणे केकेआर संघदेखील सराव करत आहे. अशात नेट्समध्ये सराव करताना रसलला गोलंदाजी करण्यापेक्षा, फलंदाजी करताना जसप्रीत बुमराहच्या चेंडूंचा सामना करायला मला जास्त आवडेल, असे सिद्धेशने सांगितले आहे.
याविषयी बोलताना सिद्धेश म्हणाला की, “मी रसलला पाहिले आहे की तो केवढी विस्फोटक फलंदाजी करतो. मी यापुर्वी कधीही त्याला गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे मला नेट्समध्ये सराव करताना त्याला गोलंदाजी करायची नाही.”
आयपीएल २०१९मध्ये मुंबई इंडियन्सकडून केवळ १ सामना खेळलेला सिद्धेश म्हणाला की, “भारतातील क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मला अर्थातच आयपीएलला मी खूप मिस केले. माझा यंदाचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम शानदार राहिला. मी जर आयपीएलमध्ये काही हंगामात दमदार कामगिरी केली, तर हे माझ्या भविष्यासाठी खूप फायद्याचे ठरेल.”
सिद्धेशला गतवर्षी आयपीएलमध्ये केवळ १ सामना खेळायला मिळाला होता. त्यात त्याने फक्त १५ धावा केल्या होत्या. जर त्याला यंदा केकेआरकडून जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली, तर तो नक्कीच दमदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-या देशातील खेळाडूंना आयपीएलमधील एका तरी सामन्याला लागणार मुकावे; जाणून घ्या कारण
-शाहरूख खानच्या नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी, तर…
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?
-३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध
-रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे