fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

September 9, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलचा १३ वा सत्र १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होईल. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहेत.

या वेळीही आयपीएलमधील सलामीवीरांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. चांगली सलामी जोडी असणार्‍या संघाची बाजू अधिक मजबूत असेल. आयपीएलच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर भरपूर धावा करणाऱ्या सलामीच्या अनेक जोड्या होऊन गेल्या. सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या यांची सलामीची जोडी बरीच लोकप्रिय झाली. त्याचप्रमाणे इतर संघांच्या सलामीच्या जोडीने बऱ्याच धावा केल्या.

या आयपीएल हंगामातही प्रत्येक संघाकडे चांगल्या सलामीच्या जोड्या आहेत आणि त्या जबरदस्त खेळ करू शकतात. जर एखाद्या संघाला चांगली सुरुवात मिळाली तर त्याच्या विजयाच्या शक्यता मोठ्या प्रमाणात वाढतात. जाणून घेऊया आयपीएलच्या या हंगामात कोणत्या ३ सलामीच्या जोड्या सर्वाधिक धावा करु शकतात.

यंदा आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी करणार या ३ सलामी जोड्या

३. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ (दिल्ली कॅपिटल्स)

या हंगामात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ही सलामी जोडी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसेल. ही सलामीची जोडी खूप खास असणार आहे, कारण एका बाजूला अनुभवी शिखर धवन तर दुसर्‍या बाजूला पृथ्वी शॉ जो एक युवा फलंदाज आहे. मागील हंगामात दोघांनीही दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली कामगिरी केली होती. हा हंगामही ही जोडी गाजवेल आणि संघाला चांगली सुरुवात करून देत धावांचा डोंगर उभारेल.

२. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो (सनरायझर्स हैदराबाद)

आयपीएलच्या शेवटच्या सत्रात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या सलामी जोडीने जबरदस्त कामगिरी केली होती. या सलामी जोडीने अनेक विक्रम नोंदवले होते. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी १८५ धावांची जबरदस्त भागीदारी केली आणि आयपीएलमध्ये पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी करण्याचा विक्रम रचला.

या हंगामातही ही जोडी धोकादायक ठरू शकते. हे दोन्ही खेळाडू इंग्लंडमधून टी-२० आणि वनडे मालिका खेळून येतील. ही जोडी या हंगामात मोठी धावसंख्या उभारून सर्वाधिक धावा करू शकते.

१. ख्रिस गेल आणि केएल राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब)

ख्रिस गेल आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीला या मोसमातील सर्वात धोकादायक सलामी जोडी म्हणू शकतो. कारण ज्या प्रमाणे केएल राहुल फॉर्ममध्ये आहे आणि दुसरीकडे ख्रिस गेल सारखा तुफानी फलंदाज. जेव्हा ख्रिस गेल खेळपट्टीवर टिकून राहील तेव्हा तो सामन्याचे चित्र बदलू शकतो. आयपीएल २०१९ मध्ये या सलामी जोडीने भरपूर धावा केल्या असून या मोसमातही ते सर्वाधिक धावा करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

यंदा ‘ही’ धावसंख्या आयपीएलमध्ये ठरणार आव्हानात्मक; या दिग्गजाचा दावा

इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व

…म्हणूनच चेतेश्वर पुजाराला आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळण्याचे दु:ख नाही

ट्रेंडिंग लेख –

३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध

आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप

रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे


Previous Post

आयपीएलमध्ये गोलंदाजांसमोर असेल ‘हे’ सर्वात मोठे आव्हान, मोहम्मद शमीने केला खुलासा

Next Post

बीसीसीआयने दिलेला प्रस्ताव नाकारात कॅप्टन कूल धोनीने घेतला धाडसी निर्णय

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी

April 11, 2021
Next Post

बीसीसीआयने दिलेला प्रस्ताव नाकारात कॅप्टन कूल धोनीने घेतला धाडसी निर्णय

शाहरूख खानच्या नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी, तर... 

या देशातील खेळाडूंना आयपीएलमधील एका तरी सामन्याला लागणार मुकावे; जाणून घ्या कारण

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.