fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा ‘ही’ धावसंख्या आयपीएलमध्ये ठरणार आव्हानात्मक; या दिग्गजाचा दावा

Ipl 2020 such score will be challenging on uae pitches says rcb head coach mike hesson

September 9, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

दुबई| रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) मधील क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. दुबई आणि अबुधाबीच्या खेळपट्ट्यांवर 150-160 धावा आव्हानात्मक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मागील आयपीएल हंगामात आरसीबी संघाविरूद्ध अखेरच्या षटकात बऱ्याच धावा प्रतिस्पर्ध्यांनी जमविल्या होत्या. “या वेळी मला अशा गोलंदाजांची ओळख पटली आहे जे चांगली गोलंदाजी करतील”, असे हेसन यांनी सांगितले.

आरसीबीच्या यूट्यूब वाहिनीवर हेसन यांनी सांगितले की, “काही मैदानावर 150-160 ही धावसंख्या चांगली मानली जाईल. येथे एक वेगळे वातावरण असेल. चिन्नास्वामी मैदान (बेंगलोर) फलंदाजीसाठी उत्तम आहे. तेथे छोटी सीमा आहे ज्यामुळे मोठी धावसंख्या बनते.”

मैदानांच्या परिस्थिती बद्दल बोलताना हेसन म्हणाले, “हो, काही मैदानाची परिस्थिती फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरेल. हे बर्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे. अबू धाबीच्या तुलनेत उर्वरित दोन्ही मैदानात (दुबई आणि शारजाह) फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे कारण चेंडू तेथे ‘स्किड’ करेल. आम्हाला दररोजच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.”

“अबू धाबीसारख्या क्षेत्रात शेवटच्या षटकांत गोलंदाजी करणे हे चिन्नास्वामीपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. आम्ही चांगल्या गोलंदाजांना ओळखले आहे.”असे हेसन यांनी पुढे सांगितले.

2016 मध्ये अंतिम सामना खेळल्यानंतर आरसीबी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे पण यावेळी संघ अधिक चांगल्या स्थितीत असल्याचा प्रशिक्षकांचा विश्वास आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व

…म्हणूनच चेतेश्वर पुजाराला आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळण्याचे दु:ख नाही

इंस्टाग्रामच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सची भरारी! अगदी सीएसकेही…

ट्रेंडिंग लेख –

३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध

आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप

रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे


Previous Post

इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व

Next Post

दोन मोठ्या पदांवर नेमणूक झाल्यामुळे ‘या’ दिग्गजावर कडाडून टीका

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे दमदार पुनरागमन! पहिल्याच सामन्यात अर्धशतकासह विराट, रोहितची केली बरोबरी

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

एमएस धोनीच्या चेन्नई विरुद्ध मैदानात उतरताच ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर ‘मोठा’ विक्रम

April 10, 2021
Next Post

दोन मोठ्या पदांवर नेमणूक झाल्यामुळे 'या' दिग्गजावर कडाडून टीका

आयपीएलमध्ये गोलंदाजांसमोर असेल 'हे' सर्वात मोठे आव्हान, मोहम्मद शमीने केला खुलासा

आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.