ऍडलेड येथे गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याने प्रतिष्ठित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांच्यात झालेल्या चर्चेचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला. या व्हिडिओमध्ये स्मिथने विराटला विश्वचषक २०१९ शी संबंधित एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे.
सन २०१९ सालच्या विश्वचषकादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या एका सामन्यात विराटने स्मिथला चाहत्यांच्या शाब्दिक माऱ्यापासून वाचवले होते. या घटनेविषयी बोलताना स्मिथने विराटला प्रश्न केला की, तू विश्वचषकादरम्यान मला का मदत केली होती?. या प्रश्नाचे उत्तर देताना विराट म्हणाला की, “तुम्ही सर्वांनी जी चूक केली होती त्याची तुम्हाला जाणीव होती. त्यानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर तुम्हाला चाहत्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. माझ्या मते, एखाद्या गोष्टीवरुन ठरावीक व्यक्तीला सतत निशाण्यावर धरणे चुकीचे आहे. कोणतीही गोष्ट स्थायी नसते.”
https://twitter.com/BCCI/status/1339144577668661249?s=20
Virat Kohli was the winner of the 2019 ICC Spirit of Cricket award for asking his team's fans to stop booing Steve Smith during #CWC19 👏
Should this moment win the ICC Spirit of Cricket Award of the Decade?
Cast your VOTE 🗳️ https://t.co/Ib6lqGqUOi pic.twitter.com/cJ5HP1hfWy
— ICC (@ICC) December 15, 2020
काय झाले विश्वचषकातील त्या सामन्यात?
मार्च २०१८मध्ये स्टीव्ह स्मिथ चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळला होता. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली होती. त्यानंतर २०१९ सालच्या विश्वचषकातून त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात एक सामना झाला होता. त्या सामन्यादरम्यान स्मिथ क्षेत्ररक्षण करत असताना चाहते त्याच्या नावाने नकारात्मक नारेबाजी करु लागले. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या विराटने चाहत्यांचा विरोध केला. त्याने चाहत्यांना नकारात्मक नारेबाजी करण्याऐवजी स्मिथसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. विराटच्या या कृत्याने सर्वांची मने जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथचा प्रश्न ऐकून विराट भावूक, आली वडिलांची आठवण; पाहा Video
कोहली-स्मिथ दरम्यान रंगला प्रश्नोत्तरांचा खेळ; विराटने दिली दिलखुलास उत्तरे
विराटने ‘या’ ठिकाणी आपल्या नेतृत्त्वात सुधारणा करण्याची गरज, व्हीव्हीएस लक्ष्मणने मांडले मत