मुंबई । भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांच्या नोंदी आहेत. याच सचिनची फलंदाजी ही परिपूर्णतेच्या अगदी जवळची होती, असे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.
‘लिटल मास्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावसकर यांनी इंडिया टुडेला सांगितले की, “माझ्या कारकीर्दीत बरेच महान खेळाडू पाहिले, पण सचिनच्या जवळ कुणीच नव्हते. फलंदाजीमधील परिपूर्णतेचा प्रश्न असेल तर सचिन त्याच्या सर्वात जवळचा होता. मी कोणत्याही फलंदाजाला त्याच्या जवळपास कधी पाहिले नाही.”
ते पुढे म्हणाले, “मी जेव्हा खेळत होतो आणि मी क्रिकेट पहात आहे तेव्हापासून मी बरेच महान फलंदाज पाहिले आहेत. परंतू सचिनच्या फलंदाजीच्या परिपूर्णतेच्या जवळ कोणीही आले नाही.”
कसोटीत प्रथमच दहा हजार धावा करणारे गावसकर म्हणाले की,” सचिन सर्व प्रकारचे शॉट्स मारण्यात पारंगत होता. ‘बॅकलिफ्ट्स, हेड शॉट्स, बॅलन्स .. सर्व काही, जेव्हा तो पुढे झुकायचा तेव्हा खेळत असे, बॅकफूट, ऑफ साइड, लेग साइड .. सर्व शॉट्स. नंतर टी 20 क्रिकेटची प्रगती झाली तेव्हा स्कूप शॉट खेळत त्याने सर्व शॉट्स खेळले. त्यांच्याकडे सर्व काही होते.”
24 वर्षांच्या कारकीर्दीत सचिनने 200 कसोटी आणि 463 वनडे सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आजही कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 53.79 च्या सरासरीने 15921 कसोटी धावा केल्या, तर वनडे सामन्यात त्याने विक्रमी 18426 धावा केल्या आहेत.